भारतीय नौदल आणि अभिमानस्पद गोष्टी

?‍♂ भारतीय नौदल इ.स. 1934 मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरूवात झाली. इ.स. 1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजय मिळविणे सोपे झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस 4 डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

?? ‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ : छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हंटले जाते.

? विशेष : आपल्या देशाचे नौदल हे जगातील सातव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे 155 युद्धनौकांच्या ताफा तर 200 मरीन कमांडों आहेत. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. ? भारतीय नौदलाकडे एकूण 87 युद्धनौका आणि 60 हजारांहून अधिक सैनिक आहेत.

?? भारतीय नौदलाची ताकद :● एअरक्राफ्ट नेणारे जहाज – 1 ● दुहेरी वाहनसेवा करणारे जहाज – 1 ● लँडींग जहाज टँक – 8 ● विनाशकारी जहाजे – 11 ● फ्रिगेट (छोटी जहाजे) – 13 ● कॉर्वेटेज – 24 ● माईन विनाशकारी जहाजे – 4 ● किनार्‍यावरील पेट्रोल जहाजे – 10 ● फ्लीट टँकर – 4 ● सर्व्हे जहाजे – 7 ,● संशोधन जहाज – 1 ● प्रशिक्षण जहाजे -3

नौदलाचे युद्धकालीन कार्य : (1) आपल्या राष्ट्रीय व सागरी सीमांचे संरक्षण करणे (2) बंदरे व समुद्रकिनारा यांचे रक्षण करणे (3) सागरी व्यापाराला संरक्षण देणे (4) शत्रूची सागरी नाकेबंदी करणे (5) सागरांतर्गत तेल व इतर खनिज संपत्ती यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे (6) जल-स्थलीय कारवायांना योग्य प्रतिसाद देणे (7) आपल्या उपस्थितीने आर्थिक व राजकीय फायदे मिळविणे (8) अनुकूल प्रसंगी लढाया करून शत्रूचे नाविक बळ खच्ची करणे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*