
?? आज सर्रास एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा पैसे देण्यासाठी रोख रक्कम देण्याऐवजी डिजीटल पेमेंटचा वापर वाढला आहे. त्यामुळे जवळ रोकड ठेवण्याची गरज पडत नाही.
?♂ दरम्यान आपली विविध कामे यामुळे सोपी झाली असली तरी ऑनलाइन फसवणुकीमुळे धोकाही वाढला आहे. ई वॉलेटचा वापर करणाऱ्यांना हॅकर्सकडून टार्गेट केले जात आहे.
? आपणास एखाद्या वस्तूची गरज असल्यास त्याबद्दल आपण नेटवर सर्च करतो. त्यानंतर मिळालेल्या नंबर किंवा वेबसाइटवर संपर्क करतो. त्याचाच वापर करून ई वॉलेटवरून फसवणूक केली जाते.
? अशी होते फसवणूक : फेक लिंकवर तुम्हाला काय हवं आहे असे विचारले जाते. त्यानंतर एक फॉर्म भरायला सांगून ट्रायल किंवा टोकन मनी म्हणून 5-10 रुपये पाठवण्यास सांगितले जाते.
? यातूनच आपली माहिती, फोन नंबर व बँक डिटेल्सची माहिती घेतली जाते. आपण पैसे पाठवल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून खात्यावरची रक्कम काढली जाते.
? सायबर अधिकाऱ्यांच्या मते : ई वॉलेटवर अनेक हॅकर्सची नजर आहे. इंटरनेटवर अनेक खोट्या लिंक असतात. आपण काहीही सर्च करतो, तेव्हा येणाऱ्या लिंकमध्ये त्यांचीही एक लिंक व नंबर दिसतो.
? समोर असणारे खरं की खोटं हे सहजासहजी समजत नाही. त्यामुळे खात्रीशीर माहिती असलेल्या अधिकृत लिंकवरूनच अशा प्रकारचे व्यवहार व माहितीची देवाण घेवाण करावी.

Leave a Reply