?♂ *मोशीत भरणार सर्वात मोठे ‘किसान’ कृषी प्रदर्शन*
⚡ भारतातील सर्वात मोठे ‘किसान’ कृषी प्रदर्शन 11 ते 15 डिसेंबर 2019 दरम्यान मोशी येथे संपन्न होणार आहे.
? या प्रदर्शनात भारतातील 600 पेक्षा अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक यामध्ये सहभागी होणार आहेत.
? प्रदर्शनात भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने सहभाग घेतला आहे. अशी माहिती संयोजक निरंजन देशपांडे यांनी दिली.
? *देशपांडे म्हणाले* : आधुनिक तंत्रज्ञान व कृषी क्षेत्रातील नवे विचार शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे.
? प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क 100 रुपये ठेवण्यात आला आहे. पूर्वनोंदणीची सुविधा greenpass.com या संकेतस्थळावर व kisan.net या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.
तरी सर्व समाज बांधवांनी या भव्यदिव्य प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. या कृषी प्रदर्शनात अनेक शेती विषयक उपकरणे, बी. बियाणे, सेंद्रिय खते, शेती विषयक व्यवसाय असे अनेक प्रकारच्या संलग्नित बाबींची ही प्रदर्शनी आहे. यातून नक्कीच आपल्याला काही उपयुक्त मिळू शकते. धन्यवाद.


Leave a Reply