⚡ जे. आर. डी. टाटांनी ज्यावेवेळी टाटा उद्योग समूहाची जबाबदारी सांभाळली, त्यावेळी त्यांच्याकडे 22 कंपन्या होत्या. त्यांच्या निवृत्तीवेळी टाटा समूहाच्या 95 कंपन्या होत्या. त्यांनी आपल्या प्रत्येक कामात शिस्त व दर्जा जपला.
??♂ उद्योगात यश मिळविताना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नाविन्यपूर्ण योजना राबविल्या. बरोबरच माणुसकीही त्यांनी कधी सोडली नाही.
??✈ इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित होते. त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. इ.स. 1929 मध्ये त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला.
✈ वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. इ.स. 1932 मध्ये त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. इ.स. 1946 मध्ये तीचे नाव बदलून एअर इंडिया ठेवले.
??♂ ‘फ्रान्समधे टाटा कुटुंबीयाला बहुमान असतानाही त्याचा त्याग करून जे. आर. डी. टाटांच्या वडिलांनी भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. भारताचे नागरिकत्व स्वीकारून उद्योग आणि देशासाठी सर्वस्व अर्पण केले.
? भारतात मूलभूत संशोधन व्हावे, यासाठी त्यांनी इ.स. 1936 मध्ये टाटा समाजविज्ञान संस्था व इ.स. 1945 मध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधन संस्थेची स्थापनेसाठी पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय इ.स. 1941 साली मुंबईत सुरू केले.
? भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना इ.स.1957 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तर इ.स. 1992 मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
?? 29 नोव्हेंबर 1993 मध्ये वयाच्या 89 व्या वर्षी जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. अशा या महान भारतीय उद्योजकास मानाचा मुजरा…!
भारतरत्न जे आर डी टाटा यांचा आज स्मृतिदिन…

- श्री. महेश रामकृष्ण बडगुजर, नाशिक

Leave a Reply