भातखेड्याच्या संतोष बडगुजरची गगनभरारी! – श्री. ललित बडगुजर, जळगांव

भातखेड्याच्या संतोष बडगुजरची गगनभरारी!
———————-
भातखेडा ता.एरंडोल येथील श्री.सुकलाल रतन बडगुजर CISF यांचे सुपुत्र श्री. संतोष बडगुजर या तरुणाने पुणे येथील ‘सिंहगड इंस्टीट्यूट, मध्ये BE मेकॕनिकलची गतवर्षी पदवीग्रहण करून टेक्नीकल महिंद्रच्या कॕम्पस् इंटरव्ह्यूत निवडीनंतर ती न स्विकारत सिमेन्सच्या इंटरव्ह्यूला सामोरे जाऊन यश प्राप्त करून मासिक रु.३०,००० वेतनानिशी सुरूवात केली. वर्षभर इमाने इतबारे दिलेल्या जबाबदारीचे पालन करून कंपनीचे लक्ष वेधून घेतले आणि अवघ्या “वर्षभरांत कंपनीने श्री.संतोष बडगुजर यांसी उत्कृष्ट कामाची पावती म्हणून रु.६.४० लाखाचे पॕकेज देणेचे जाहीर करून २ डिसेंबर २०२०ला कंपनीतर्फे जाहिर सत्कार करणेचे योजिले आहे.
“एका वर्षात अश्याप्रकारे बढती क्वचितच् मिळते.”
श्री.संतोष बडगुजरच्या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर्स प्राउड तथा वेब पोर्टल टीमतर्फे हार्दिक अभिनंदन व कौतुक तसेंच नव्याने मिळालेल्या जबाबदारीचे अत्युत्तम कार्यासांठी तथा बडगुजर समाजाचे नांव उंचावणेसांठी खुपखूप शुभेच्छाl

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*