थँलेसेमिया आजाराने ग्रस्त असलेल्या एका पेंशटला रक्तदान करून नाशिकच्या संदीपभाऊंनी जपला माणुसकीचा धर्म

रक्तदान एक जीवनदान

नाशिक येथे थँलेसेमिया आजाराने ग्रस्त असलेल्या एका पेंशटला तातडीनं रक्त लागणार होते. याविषयीची माहिती संदीप कोतवाल यांना मिळाली. गरजवंताला मदतीचा हात देण्यासाठी आपले सर्वाचे लाडके व्यक्तिमत्व नाशिक नगरीतील श्री. संदीप भगवान कोतवाल हे पुढे सरसावले व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जनकल्याण ब्लड बँक मध्ये जाऊन ऐच्छिक रक्तदान केले. ह्या उत्कृष्ट कार्यास आपले रक्तदान करुण आपल्या अंगी असलेला माणुसकी हा धर्म जपला.
श्री. संदीप भगवान कोतवाल, मुळ गाव एकलग्न येथील रहिवासी असून हल्ली ते मुक्काम नाशिक इथे आहेत. ते एक कुशल इंजिनिअर आहेत. आणि बडगुजर प्राऊड ग्रुपचे सदस्य आहेत. आणि www.badgujar.in वेब पोर्टल बनविण्यासाठी त्यांचे अमुल्य योगदान आहे. आणि वेब पोर्टल टिमचे महत्वपुर्ण दुवा आहेत. वेब पोर्टल तयार करणाऱ्या युवकांना संघटित करून योग्य दिशा दाखविण्याचे कार्य संदीप भाऊंनी केले आहे.

तसेच समाजातील युवा वर्गाला व्यवसाय मार्गदर्शन पर असा ‘चला उद्योजक घडवू या’ हा कार्यक्रम घेत आहोत. वेब पोर्टल टिम मधील उमदे नेतृत्व असलेले नाशिक टीम प्रतिनिधी. विशेषतः संदीप भाऊ यांची समाजाच्याप्रती सुध्दा चांगली गरुडझेप आहे.

रक्तदान केल्यानंतर त्यांना जनकल्याण ब्लड बँक तर्फे कळाले कि अशा मुलांसाठी एक रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्या शिबिरात रक्तदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

ह्या प्रसंगी आपणा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की,

नाशिक येथे, येणाऱ्या 14 डिसेंबर 2019 ला रक्त दान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे, गरजवंत मुले/मुली यांच्या साठी रक्तदान शिबिर सुरु होईल.
ह्या शिबीरात, महत्वपूर्ण म्हणजे जे मुले वय वर्षे २० ते २५ वयोगटातील असतात पण रक्त प्रवाह कमी असल्याने ते मुले वय वर्षे ७ ते १० वर्षातील दिसतात. या आजाराला थँलेसेमिया असे म्हणतात.
अश्या गरजवंत मुलामुलींचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे…
10 डिसेंबर पासुन ते 13 डिसेंबर पर्यंत आपण जनकल्याण ब्लड बँक, गंगापूर रोड नाशिक येथे रक्त दान करू शकता, कारण14 डिसेंबर 2019 ला मुलांना रक्त द्याचे आहे.
तरी आपण मोठ्या मनाने पुढे येऊन किंवा नाशिक येथील आपले नातेवाईक आप्तेष्टांना कळवा व सत्कर्म करण्यास प्रेरित करा ….ही सदिच्छा.

अश्या शिबिरात आपण सुध्दा सहभाग नोंदवू आणि एक जिव वाचवू…. असे आवाहन श्री. संदीप कोतवाल यांनी केले आहे.

श्री. संदीप भाऊ कोतवाल रक्तदान करतांना

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*