बडगुजर समाजदूतच्या दिवाळी अंक “जागृती” चे धुळे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.राजु भुजबळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला – श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी

?????????
♦♦♦♦♦♦♦♦♦

बडगुजर समाजदूतच्या दिवाळी अंक “जागृती” चे धुळे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.राजु भुजबळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला
♦♦♦♦♦♦♦♦♦
बडगुजर समाजाचे मानबिंदू समजल्या जाणाऱ्या प्रसिद्ध वृत्तपत्र बडगुजर समाजदूत च्या यंदाच्या 2019 सालच्या दिवाळी अंक जागृतीला मराठी पत्रकार संघामार्फत रोख 1001 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन खांदेशातुन एकूण 54 दिवाळी अंकांपैकी उत्तम दिवाळी अंक म्हणुन गौरविण्यात तसेच सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी Zee 24 taas NEWS channel चे धुळे जिल्हा प्रतिनिधी श्री प्रशांत परदेशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. राजू भुजबळ तसेच जिल्हा माहिती अधिकारी हे उपस्थित होते . यांच्या प्रमुख उपस्थितीत बडगुजर समाजदुत अंकाचे संपादक प्रा.श्री ईश्वर हरचंद बडगुजर, प्रा. श्री राजेंद्र भालचंद्र बडगुजर, श्री मनोहर बन्सीलाल बडगुजर व श्री अशोक सिताराम बडगुजर यांनी पुरस्कार स्वीकारला.
जागृती दिवाळी अंकास मिळालेल्या सन्माना बद्दल बडगुजर समाजदूत परिवाराचे हार्दिक अभिनंदन
??? शुभेच्छुक ???
अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
?????????
♦♦♦♦♦♦♦♦♦

1 Comment

  1. ? !! मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !! ?

Leave a Reply

Your email address will not be published.


*