अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती ची सर्वसाधारण सभा वर्षी तालुका शिंदखेडा येथे दिनांक 3 नोव्हेंबर रविवार रोजी उत्साहात संपन्न झाली.
वर्षीच्या शनिमहाराज मंदिराच्या भव्य अशा सभा मंडपात महासमितीचे अध्यक्ष श्री माधवराव जानकीराम बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली व वर्षीचे सप्तशृंगी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. डी. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महासमितीचे माजी अध्यक्ष श्री. उमेश हिरालाल करोडपती, श्री. आनंदा धोंडू सूर्यवंशी, श्री नथू अण्णा बडगुजर, जुनागड येथील चामुंडा माता मंदिराचे पुजारी प्रफुल्लगिरी महाराज, श्री. हिरालाल दोडे, सौ. देवयानी बडगुजर, श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर, जळगाव बोर्डिंग चे अध्यक्ष श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर, श्री. राजेंद्र दिगंबर नंद्वाळकर, श्री. दिलीप राघो बडगुजर, श्री. मोहन हिरालाल बडगुजर, श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर आदी मान्यवर व महासमितीचे पदाधिकारी विविध समिती प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

समाजाची कुलदैवत आई चामुंडा मातेचे प्रतिमा पूजन करून व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महासचिव श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर यांनी प्रास्ताविक भाषणात महासमितीच्या प्रभावी कार्याची माहिती कथन केली. विषय सुचिनुसार प्रत्येक विषयावर सांगोपांग चर्चा घेऊन मंजुरी देण्यात आली. यावेळी महासमिती अंतर्गत कार्य करणाऱ्या विविध समित्यांच्या कामकाजाचा आढावा, सविस्तर अहवाल सादर करण्यात आला. महासमिती व तिच्या उपसमित्यांच्या कामकाजाचे उपस्थित सदस्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. आगामी काळात महासमितीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमात संघटन कार्याची रूपरेषा निश्चित करण्यात आली. यासाठी नियोजन करण्यात आले. सर्व बडगुजर समाज मंडळांच्या अध्यक्षांची भव्यदिव्य परिषद घेणे, सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे, वधू-वर परिचय पुस्तकेची निर्मिती करणे, युवकांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी युवक मेळावा आयोजित करणे, समाजात प्रबोधन व संघटन करण्यासाठी समाज मेळाव्याचे आयोजन करणे, महिलांचे संघटन उभारणे, उपवर मुला-मुलींचे विवाह जमण्यासाठी पालकांचे प्रबोधन करणे समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करणे.

प्रसार माध्यमांचा उपयोग समाजातील एकजुटीसाठी व सर्वांगीण विकासासाठी आदर्श आचारसंहिता अमलात आणणे. महासमितीची सभासद संख्या वाढवून सर्वांना महासमितीच्या संघटन प्रवाहात आणणे. महासमितीची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या. तसेच महासमिती जवळील रक्कम फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

साप्ताहिक बद्गुजर समजदूत पुरस्कृत जागृती दिवाळी अंकाचे प्रकाशन
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून समाजाचा मानबिंदू असलेले साप्ताहिक बडगुजर समाजदुत च्या ‘जागृती’ दिवाळी अंकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अत्यंत प्रभावी लिखाण व सप्तरंगी विविध साहित्यांनी नटलेल्या जागृती या दिवाळी अंकाची अनेकांनी स्तुती केली. संपादक प्रा. ईश्वर बडगुजर, उपसंपादक श्री. संतोष भिलाजी बडगुजर, नाशिक, कार्यकारी संपादक श्री. पी. डी. बडगुजर जळगाव, सहसंपादक श्री. मनोहर बन्सीलाल बडगुजर, धुळे व सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी या दिवाळी अंकाचे टाळ्या वाजवून स्वागत केले.


Leave a Reply