ठाणे : डोंबिवली येथील रिजन्सी इस्टेट या मोठ्या वसाहतीत दिपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायं 7:30 वाजता श्री साईबाबा मंदिरात 5555 दिपप्रज्वलन करून भव्य असा दिपमहोत्सव साजरा करण्यात आला.

श्री साईबाबांनी दिवाळीत पाण्याने दिपप्रज्वलन करून दिपावली साजरी केली होती, त्याघटनेला उजाळा देण्यासाठी हा उपक्रम गेल्या 10 वर्षापासून श्री. मोहन हिरालाल बडगुजर हे राबवित आहेत. या भव्य अशा दिपमहोत्सव उत्साहात प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस
आयुक्त माननीय श्री. दत्तात्रय कराळे साहेब मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. डि. के. चौरे साहेब नवनिर्वाचित आमदार – राजू पाटील, नगरसेवक – जालिंदर पाटील, नगरसेवक – रमाकांत पाटील जिल्हा सरचिटणीस- श्री. शिवाजी आव्हाड अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

अप्पर पोलीस आयुक्त साहेबांनी या कार्यक्रमाचे दिप प्रज्वलित करीत असताना असे सांगितले की, आजच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात हा मोठा दिपमहोत्सव श्री. मोहन बडगुजर यांनी साजरा करून डोंबिवलीच्या सांस्कृतिक नगरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला.
या दिपमहोत्सवात 10 ते 12 हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सदरचे नियोजन, आयोजन हे श्री. मोहन हिरालाल बडगुजर, श्री. विजय बडगुजर सौ. मीनाक्षी मोहन बडगुजर, कु. आरती बडगुजर, सौ. सोनिया विजय बडगुजर, श्री. हर्षल हंसाठे, श्री. चंद्रहास चौधरी व बडगुजर परिवाराच्या वतीने साईंच्या कृपेने दिपमहोत्सव करून दिपावली साजरी करण्यात आली.


Leave a Reply