दि.24/10/ 2019. एंजल्स इंग्लिश मिडीयम स्कूल, नंदुरबार येथील चिमुकल्या विद्यार्थी व शिक्षकांनी नुकताच एक अभिनव उपक्रम पार पडला. नंदुरबार येथील साधारण वस्तीत राहणाऱ्या गरजू मूलांसोबत “फटाके मुक्त दिवाळी” साजरी केली. सामाजिक भान जपत, मिळूनमिसळून तसेच गरीब श्रीमंत हा भेदभाव न करता आनंदाने सण कसा साजरा करायचा हे उद्दिष्ट शाळेने समोर ठेऊन मुलांना समानतेची शिकवण दिली.


ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. व सौ. समीर शहा तसेच सौ. पुर्णिमा बडगुजर हे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ .प्रीती बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ .हर्षदा शुक्ल,सौ.संगिता पाटील,सौ .सोनाली देसले,सौ.वैशाली पाटील ,सौ.जयश्री पाटील,सौ.प्राजक्ता नाहिदे,सौ.शिवानी पाटील,कु.हर्षाली दराडे,कु.शुभांगी पाटील ,कु.अस्मिता भामरे या शिक्षिकांनी परीश्रम घेतले.
– श्री. गिरीश बडगुजर chairman

Leave a Reply