चि. अक्षय बडगुजर ऑस्ट्रेलिया येथे रवाना जळगाव महानगरपालिका येथे आरोग्य विभागामध्ये आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले श्री काशिनाथ खंडू बडगुजर व आई सौ मनीषा काशिनाथ बडगुजर हल्ली मुक्काम जळगाव यांचा मुलगा चि. अक्षय याचे बी ई कॉम्प्युटर शिक्षण झाले असून तो सद्या पुणे येथील Arxxus Cloud Solutions, या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहे , चि. अक्षय प्रामाणिक ,मेहनती, हुशार असल्याने कंपनीने त्याची 3 महिने कालावधी साठी ऑस्ट्रेलिया येथे नवीन प्रकल्पासाठी निवड केलेली असून त्याने नुकतेच ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे प्रयाण केले, चि अक्षय यांची लहान बहीण कु अक्षता हीचेही बी ई कॉम्पुटर शिक्षण झालेले असून ती पुणे येथे ATOS-Syntel या सॉफ्टवेअर कंपनी मध्ये कार्यरात आहे. चि अक्षय यास प्रवास व भावी आयुष्यासाठी मुकटी येथील आजोबा श्री दत्तात्रय शंकर बडगुजर आजी सौ पुष्पा बाई मामा श्री प्रदीप बडगुजर, अभियंता मनपा धुळे,श्री मनोज बडगुजर, सर्व्हेअर, भूमी अभिलेख, धुळे व मामी प्रा डॉ सौ जयश्री बडगुजर व सौ सपना बडगुजर, प्रा. शिक्षिका तसेच सर्व आप्तेष्ठ नातेवाईक व समाजबांधवांनी आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या.
अक्षय बडगुजर, हे सामाजिक कार्यात पण नेहमी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सहभागी असतात. ते बडगुजर प्राऊड ग्रुपचे २०११ पासून सदस्य आहेत आणि नेहमीच मदत करीत असतात. आम्हाला आनंद वाटतो कि आपला टिम मेंबर हा प्रगतीपथावर आहे. अशीच यशस्वी वाटचाल पुढे ही होवो. आपणांस हार्दिक शुभेच्छा. अ. भा. ब. स. युवक समिती बडगुजर प्राऊड ग्रुप


Leave a Reply