जळगांव- नुतन मराठा महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रा.डॉ. अविनाश योगराज बडगुजर यांच्या मार्गदर्शनात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे उत्तरपत्रिका मुल्यांकन मार्गदर्शन कार्यक्रम हा पाच दिवसाचा उपक्रम दि.११ ऑक्टोंबर ते १५ ऑक्टोंबर २०१९ या वेळेत जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात संपन्न झाला. यावेळी विद्यापीठा तर्फे दोन प्राध्यापकांची मार्गदर्शनासाठी निवड करण्यात आली होती. त्यात प्रा.डॉ. अविनाश बडगुजर हे एक होते.

यावेळी विद्यापीठा तर्फे उत्तरपत्रिका मुल्यांकन मार्गदर्शन कार्यक्रमासाठी तिन्ही जिल्हात विभाग करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यात एम.जे. कॉलेज, जळगांव व डी.एन. कॉलेज, फैजपुर; धुळे जिल्ह्यात जय हिंद कॉलेज, धुळे व सी.जी. पाटील कॉलेज, साक्री; तसेच नंदुरबार जिल्ह्यात शहादा येथे प्रा.डॉ. अविनाश बडगुजर यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना ३० ते ३५ चा ग्रुप करून उत्तरपत्रिका कशी तपासावी व गुणांचे मुल्यांकन कुठल्या गोष्टीवर असावे व करावे, जेणे करून शिक्षकांना सोपे होईल तसेच विद्यार्थ्यांचे ही चुकीच्या गुण मुल्यांकनाने नुकसान होणार नाही याचे मार्गदर्शन प्रा.डॉ. अविनाश बडगुजर यांनी केले.

प्रा.डॉ. अविनाश योगराज बडगुजर हे मुळचे धरणगाव येथील राहिवाशी आहेत. प्रा.डॉ. अविनाश बडगुजर यांना शैक्षणिक वारसा हा त्यांचे वडिल श्री योगराज शंकर बडगुजर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) यांच्या तर्फे लाभला आहे. तसेच प्रा.डॉ. अविनाश बडगुजर यांचे लहान बंधु प्रा. दिवाकर बडगुजर हे देखील जामनेर येथे गणित विषयाचे प्राध्यापक आहेत. ते श्री.मन्साराम शिंदे, दोंडाईचा (सेवानिवृत्त महावितरण अधिकारी) याचे जावाई आहेत. प्रा.डॉ.अविनाश बडगुजर यांनी आजवर विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी या विषयावर अगदी सोप्या भाषेत आता पर्यंत १३ पुस्तके लिहीली आहेत. त्यात सध्या प्रथम वर्ष कला, व्दितीय वर्ष कला व एम.ए. साठी लिहिलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. आता पर्यंत त्यांनी एकूण ९१ शोध निबंधांचे परिषदांमध्ये सादरीकरण केले आहे. यात २५ आंतरराष्ट्रीय, ४५ राष्ट्रीय पेपर सादर केले आहेत. त्याचे एकूण 30 शोध निबंध प्रकाशित झाले आहेत.

प्रा.डॉ. अविनाश हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात इंग्रजी विषयाच्या अभ्यासमंडळाचे सदस्य आहेत. तसेच ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक संघटना, जळगाव (एन- मुक्ता) तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ चे महामंत्री पदावर कार्यरत आहे. प्रा.डॉ. अविनाश यांची विद्यापीठाच्या परीक्षा समिती, LIC समिती, निवड समिती, CAS समिती, बृहत आराखडा समिती इ. मध्ये ही सदस्य म्हणुन निवड झाली आहे. व्हिजिटिंग फाकल्टी म्हणून विविध महाविद्यालयात त्यांनी व्याख्यान केले आहे. प्रा.डॉ. अविनाश यांच्या मार्गदर्शनात दोन प्राध्यापकांना पीएचडी प्रदान झाली आहे यात एक प्राध्यापक हे येमेन देशातील आहेत.

प्रा.डॉ. अविनाश बडगुजर यांची निवडणूक आयोग मुंबई (महाराष्ट्र) यांच्या अंतर्गत जिल्हाधिकायांद्वारे लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे जिल्हास्तरीय भाषांतरकार म्हणुन निवड झाली आहे. तसेच संसदीय / विधानसभा / महानगर-पालिका निवडणुकांसाठीचे पीठासीन अधिकारी म्हणुन ही निवड झाली आहे. प्रा.डॉ. अविनाश बडगुजर यांनी विविध अभ्यास क्रमात प्राविण्य मिळवीले आहे. प्रा. डॉ. अविनाश बडगुजर यांना एस.पी.डी.एम कॉलेज, शिरपुर जि.धुळे येथे होणाऱ्या बॅटमेंटन व हॉली बॉल स्पर्धेच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणुन आमंत्रित करण्यात आले आहे. प्रा.डॉ. अविनाश बडगुजर यांना त्याच्या पुढील शैक्षणिक मार्गदर्शन व कार्यास हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक:-??????
समस्त बडगुजर- डांगे परिवार, धरणगांव, जि.जळगांव.

Thanks for acknowledgement of my work on the web portal of Badgujar Samaj