करवंद विदयालयाचे मुख्याध्यापक बापूसो. श्री. व्ही.डी. बडगुजर तालुकास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित.
कळमसरे येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात करवंद येथील कर्मवीर डाॅ भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसो. श्री. व्ही. डी.बडगुजर यांना श्री.मोहन दयाराम सोनवणे व श्री. वाय. टी. शिंगाने यांच्या हस्ते व कि. वि. प्र.संस्थेचे सचिव नानासो.निशांत रंधे, नगरसेवक बाबासो. रोहित रंधे,व्यवस्थापक बापूसो.के.डी.बच्छाव यांच्या उपस्थितीत आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.हा कार्यक्रम उद्यान पंडित बापूसाहेब ग. द. माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष दादासो. मोहन दयाराम सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचा गौरव करून नवीन पायंडा सुरू केला याबद्दल शिरपूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष कौतुक होत आहे. शिक्षकांना त्यांच्या क्षेत्रात काम करण्याची नवी ऊर्जा मिळेल असा आशावाद यानिमित्ताने प्रमुख पाहुण्यांकडून व्यक्त करण्यात आला. या स्तुत्य निवडीबद्दल किसान विद्या प्रसारक प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार विश्वासराव रंधे, सचिव निशांत विश्वासराव रंधे, कोषाध्यक्ष आशाताई रंधे,भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, नगरसेवक बाबासो.रोहित रंधे, संस्थेचे सर्व व्यवस्थापक व विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.




छान लेख आहे.