?रक्तदानाचे फायदे?- श्री. विजय बडगुजर, नंदुरबार

???रक्तदान???
———————–
?रक्तदानाचे फायदे? ___________
रक्तदान हेच जिवनदान असे म्हटल जाते. कारण तुमच्या रक्तदानाने कुठल्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकते. अनेक जण विचार करतात की आम्ही रक्तदान का करावे, त्याने आम्हाला काय फायदा होणार? जे बरोबर देखील आहे. आजच्या ह्या स्वार्थी जगात का म्हणून आपलं रक्त कोणाला असं फ्री मध्ये वाटत फिरायचं, त्याचा आपल्याला पण काही फायदा नको का व्हायला?
??म्हणूनच आज आम्ही आपल्याला रक्तदानाचे काही असे फायदे सांगणार आहोत जे ऐकल्यावर तुम्ही स्वतःहून नियमितपणे रक्तदान कराल.

? रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो :
रक्तदान केल्याने रक्ताचा प्रवाह सुधारतो. ह्यामुळे ब्लड वेसल्सच्या लायनिंग डॅमेज होत नाहीत. त्यामुळे शरीरातील आर्टरी ब्लॉकेज कमी होतो. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका ८८ टक्क्यांनी कमी होऊन जातो. Loyola University Health System Blood Bank चे संचालक Phillip De Christopher ह्यांनी सांगितले की, इतर लोकांच्या तुलनेत नियमित रक्तदान करणारे लोक खूप कमी प्रमाणात दवाखान्यात भर्ती होत असतात. राक्तदात्याला हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक आणि कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता फार कमी असते.

? शरीरातील कॅलरीज कमी होतात :
जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर ते तुम्ही रक्तदान करून देखील करू शकता. रक्तदान हे फिट राहण्यासाठी एक योग्य आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. एका वेळी रक्तदान केल्याने शरीरातील ६५० कॅलरीज कमी होतात, त्यामुळे जर तुम्ही दर तीन महिन्याला रक्तदान केले तर तुमच्या किती कॅलरीज कमी होतील, नाही का?

? फ्री चेक-अप :
रक्तदानाआधी तुमचे चेक-अप केल्या जाते. ज्यामध्ये तुमच्या शरीराचे तापमान, पल्स रेत, ब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन इत्यादीची तपासणी केली जाते. त्यानंतर रक्त टेस्ट साठी पाठवले जाते, ज्यामध्ये तुमच्या रक्तावर १३ वेगेवेगळे टेस्ट केले जातात. त्यामुळे जर तुम्हाला कुठला आजार झाला असेल, किंवा तुमच्या शरीरात कशाची कमी असेल तर ते तुम्हाला लगेचच कळते ते ही फ्री.

? शरीरात Iron चे योग्य प्रमाण नियमित राखले जाते :
आपल्या शरीरात ५ ग्राम एवढे Iron असते. Iron जास्तकरून रेड ब्लड सेल्स आणि बोन मॅरोमध्ये असते. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा १/४ एवढे Iron निघून जाते. पण ह्या Iron ची कमतरता एका आठवड्यात तुमच्या जेवणातून भरून निघते. त्यामुळे शरीरातील Iron चे संतुलन बनून राहते. तसेही शरीरात जास्त Iron ब्लड वेसल्स साठी हानिकारक असते.
एका व्यक्तीच्या रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. मग आता जर आपले रक्त दान केल्याने इतरांना तसेच आपल्यालाही फायदा होत असेल तर रक्तदान का करू नये…


? ⁉ रक्तदान कोणी, केव्हा व कुठे करावे : –

वयाच्या १८ वर्षानंतर (६५ वर्षापर्यंत)
वजन ४५ कि.ग्रॅ. च्या वर असल्यास..
रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास..
आपण पूर्णपणे निरोगी असल्यास..
दर ३ महिन्यांनी आपण रक्तदान करावे.
जवळच्या रक्तपेढीत औंढा नागनाथ. वसमत. नरसी नामदेव या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात आपण रक्तदान करू शकता.


?⁉ रक्तदान कोण करू शकत नाहीत ?
मागील ३ दिवसांत कोणतेही पतिजैविक औषध घेतले असल्यास.
मागील ३ महिन्यात मलेरिया झाला असल्यास.
मागील १ वर्षात विषमज्वर, काविळ किंवा श्वानदंश होवून रेबीजची लस घेतली असल्यास.
६ महिन्यापूर्वी आपली मोठी शस्त्रकिया झाली असल्यास.
गर्भवती महिला, महिलेला १ वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा ६ महिन्यात गर्भपात झाला असल्यास.


?❔‼ कायमचे बाद रक्तदाते :-
कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, काविळ (ब, क प्रकारची), एड्स, मुत्रिपड रोग, यकृताच्या व्याधी असल्यास. धन्यवाद.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*