कुलस्वामिनी चामुंडा माता प्रसन्न
बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद तर्फे आयोजित गुणवंत पाल्यांचा गुणगौरव व सामाजिक कार्यकर्ते बंधु- भगिनींचा सत्कार तसेच मिटींगचा कार्यक्रम उत्साहात संपन्न..
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद तर्फे गुणवंत पाल्यांचा गुणगौरव व सामाजिक कार्यकर्ते बंधु- भगिनींचा सत्कार तसेच मिटींगचे आयोजन दिनांक – २२ सप्टेंबर २०१९ रोजी रविवारी सकाळी १०:३० ते दुपारी ३:०० वा. मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर हॉल (MASSIA), कॉसमॉस बॅंक, मोरे चौक, बजाजनगर, MIDC, वाळुज, औरंगाबाद येथे न भुतो ना भविष्यती असा संपन्न झाला.

यावेळेचा कार्यक्रमाचे आयोजन हे सर्व बडगुजर समाजाला नाव लौकीक करण्यासारखा पार पडला. यावेळी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यातील बडगुजर समाजाच्या वेगवेगळ्या युवक संघटना व मंडळाचे युवा कार्यकर्ते हे एका छताखाली एकत्र पहिल्यांदाच आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक श्री. दिलीप राघो बडगुजर, नंदुरबार (प्रमुख अ. भा. बडगुजर समाज युवक समिती) हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खालील प्रमाणे.
१. सौ. सारीकाताई महेंद्र पवार(भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस, पिंपरी चिंचवड, पुणे.)
२. सौ. सविता पंकज बडगुजर (कार्यकर्त्या- बडगुजर समाज उन्नती मंडळ, भुसावळ)
३. श्री. लोकेश रविंद्र कोतवाल (बडगुजर प्राऊड ग्रृप, पुणे)
४. श्री. प्रशांत प्रकाश बडगुजर (सदस्य- अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, नाशिक)
५. श्री. मुकेश काशिनाथ बडगुजर (बडगुजर सरस्वती मिशन, पाचोरा)
६. श्री. अविनाश दिवाकर बडगुजर (अध्यक्ष- बडगुजर युवा संघटन, नवी मुंबई)
७. श्री. किशोर जगन्नाथ बडगुजर (शहराध्यक्ष- बडगुजर समाज युवक मंडळ, धुळे)
८. श्री. दिनेश शामराव बडगुजर (सहसचिव- बडगुजर समाज उन्नती मंडळ, नंदुरबार)
९. श्री. दिपक जिवराम बडगुजर (अध्यक्ष- श्री चामुंडा माता युवक मंडळ, नाशिक)
१०. श्री. सचिन सुकलाल बडगुजर (बडगुजर समाज सरस्वती मिशन, अर्थे)

११. श्री. ऋषिकेश देवीदास बडगुजर (उद्योजक- भुसावळ)
१२. श्री. अमित चंद्रकांत बडगुजर (संस्थापक अध्यक्ष- नवोदय युवा मंच, फागणे)
१३. श्री. ज्ञानेश्वर जगन्नाथ बडगुजर (बडगुजर सरस्वती मिशन, ठाणे)
१४. श्री. प्रणव रतिलाल कोतवाल (सदस्य- अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, फागणे)
१५. श्री. विजय संतोष बडगुजर (अध्यक्ष- बडगुजर समाज उन्नती मंडळ, नंदुरबार)
१६. श्री. देविदास भगवान बडगुजर (खजिनदार- बडगुजर समाज उन्नती मंडळ, नंदुरबार)
१७. श्री. धिरज मधुकर बडगुजर (अध्यक, चामुंडा देवी ट्रस्ट, सोनशेलु, शहादा)
१८. श्री. रविंद्र संतोष बडगुजर (सदस्य- अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, शिंदखेडा)
१९. श्री. अरविंद सिताराम बडगुजर (सदस्य- श्री चामुंडा माता युवक मंडळ, नाशिक)
२०. श्री. सुशिल विनोद मारुमर्दाने (सेक्रेटरी- बडगुजर समाज सेवा ट्रस्ट, अहमदाबाद)

२१. श्री. विजय रतिलाल कोतवाल (उपाध्यक्ष- बडगुजर युवा संघटन, सुरत)
२२. श्री.जितेंद्र कमलाकर नंदवाळकर (सदस्य- नवोदय युवा मंच, फागणे)
२३. श्री. संदिप चंद्रकांत बडगुजर (सामाजिक कार्यकर्ते- चाळीसगांव)
२४. चि. राहुल अशोक बडगुजर (नवोदय युवा मंच, अमळनेर)
२५. श्री. अमोल सुरेंद्र वासेवाय (सचिव- बडगुजर समाज मंडळ, अमरावती)
२६. श्री. जितुभाई आनंद बडगुजर (बडगुजर युवा संघटन, सुरत)
२७. श्री. मनिष मोहन बडगुजर (बडगुजर प्राऊड ग्रृप, पुणे)
२८. श्री. चंद्रकांत सुभाष बडगुजर (सदस्य- अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, बोराडी)
२९. श्री. जयवंत मधुकर पवार (बडगुजर सरस्वती मिशन, हरे. पिंपळगांव)
३०. श्री. निलेश शरदराव बडगुजर (सदस्य- बडगुजर समाज उन्नती मंडळ, भुसावळ)
सर्व मंडळी होती.तसेच श्री. कैलास लक्ष्मण बडगुजर (अध्यक्ष- बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद व सौ. भावना सुनिल बडगुजर (महिला अध्यक्ष- बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद) हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.


कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी व मान्यवर यांचे स्वागत करून, व्यासपिठावर स्थान ग्रहण करण्यास सांगितले, समाजात निधन पावलेल्या व्यक्तींना श्रध्दांजली वाहिली व ठरल्या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेखा सर्व मंडळींना सुत्रसंचलन करीत सौ. भावनाताई व सौ. किर्तीताई निलेश बडगुजर यांनी सांगितली. सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिलीप बडगुजर व सौ.सारीकाताई महेंद्र पवार यांच्या हस्ते आई चामुंडा मातेच्या प्रतिमेचेला हळदी कुंकू व फुलहार अर्पण करून करण्यात आले. तसेच उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.या वेळी बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद तर्फे ‘बडगुजर समाज व सोशल मिडीया’ या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल होते. स्पर्धेत सौ. प्रियंकाताई हर्षल बडगुजर, श्री नरेंद्र सिताराम बडगुजर, व श्री.सुनिल रमेश बडगुजर यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अशोक मधुकर बडगुजर यांनी मांडले.

सर्व प्रमुख अतिथींचा PPT च्या माध्यमातून परीचय करुन देण्यात येवुन प्रमुख अतिथी यांना सन्मानपत्र देवुन गौरवण्यात आले. लहान विद्यार्थी बालमित्रांना पेन व वाॅटर बाॅटल देवुन, ७ ते ९ वी.च्या विद्यार्थांना शालेय उपयोगी पेपर पॉड देऊन गौवरविण्यात आले. इयत्ता १० वी व १२ वी मध्ये विशेष गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थींना स्कुल बॅग देऊन गौवरविण्यात आले. विद्यार्थांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उद्योजक महिलां सौ. हर्षाली मनोज शिंदे, सौ.छाया राजेंद्र बडगुजर, सौ.मिना संजय बडगुजर व सौ. प्रिती राजेंद्र बडगुजर यांचा सत्कार सौ.सारीकाताई महेंद्र पवार व सौ.सविताताई पंकज बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात गुन्हेगारांना योग्य शिक्षेला पात्र ठरविणारे विशेष सरकारी वकील श्री. प्रविण पंडित चव्हाण यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना व आई साखरबाई यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लोकप्रिय समाजकार्य कर्ते श्री.सुनिल रमेश बडगुजर यांना पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सन्मानचीन्ह प्राप्त झाल्याबद्दल बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद च्या वतीने सुनिलभाऊ व त्यांच्या पत्नी भावनाताई यांचा सत्कार केला. तसेच श्री.अशोक भिकाजी बडगुजर, नवोदय युवा मंच, फागणे, श्री चॉमुंडामाता युवक मंडळ, नाशिक, बडगुजर प्राऊड यांनी ही शाल व श्रीफळ देऊन सुनिलभाऊंचा सत्कार केला. तसेच सौ प्रियंका हर्षल बडगुजर व श्री नरेंद्र बडगुजर यांचा ही वकृत्व स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल सत्कार करून बक्षिस देण्यात आले. बडगुजर वेब पार्टल तर्फे घेण्यात आलेल्या गणपती मखर सजावट स्पर्धेचे विजेते श्री उमेश अशोक बडगुजर, औरंगाबाद यांना ही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

व्यासपीठावरील उपस्थित श्री दिलीप बडगुजर, लोकेश कोतवाल, विजय बडगुजर, अविनाश बडगुजर, ज्ञानेश्वर बडगुजर, प्रशांत बडगुजर, मनिष बडगुजर, सौ सारिका पवार, दिपक बडगुजर इतर मान्यवरांनी आपले विचार बडगुजर समाज व सोशल मिडीया यावर मांडलीत व पुढील कार्य कसे व कुठल्या प्रकारे करण्यात येईल याचे थोडक्यात मार्गदर्शन केले.

यावेळीचे कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे बडगुजर समाज मंडळ आयोजित कार्यक्रमात सर्व उपस्थित युवा मान्यवरांना एका भव्यमोठ्या पुष्पहाराने बडगुजर समाज मंडळ औरंगाबादच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले व सर्व बडगुजर समाजात एकत्र असल्याचे सिद्ध करुन दाखविले. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम फेसबुक व युट्युब वर लाइव्ह प्रेक्षपण करण्यात आला होता. या नंतर सर्व उपस्थित समाज बांधवांनी भोजनाचा अस्वाद घेतला व इतर समाज बांधवांशी हितगुज साधले.

कार्यक्रमाच्या शेवटी बडगुजर समाज मंडळ औरंगाबादचे अध्यक्ष श्री कैलास लक्ष्मण बडगुजर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ भावनाताई व सौ किर्ती निलेश बडगुजर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कु. डॉली सुनिल बडगुजर (संगणक साहाय्य), अशोक भिका बडगुजर, अशोक मधुकर बडगुजर, संजय महादु बडगुजर, निलेश भिका बडगुजर., रूपेश बापुराव, गजानान दत्तात्रय बडगुजर, चंद्रकांत खंडु बडगुजर, चंद्रकांत दगडु बडगुजर, हर्षल सुरेश बडगुजर, जितेंद्र भास्कर बडगुजर, अतुल प्रकाश बडगुजर, जगदीश रामदास बडगुजर, सिमाताई, प्रियंकाताई यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास सर्व औरंगाबाद बडगुजर समाज बांधवांची उपस्थिती लाभली तसेच ह्या कार्यक्रमाला जे समाज बांधव येऊ शकले नाही अथवा उपस्थित न होते ते देखील या कार्यक्रमाचे चित्रकरण व फोटो बडगुजर प्राऊड, युट्युब, बडगुजर वेब पोर्टल व औरंगाबाद बडगुजर बेव साईट वर पाहु शकता..

धन्यवाद..!
सर्व कार्यकारणी मंडळ,
बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद.
आई चॉमुंडा मातेचा अशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो…


औरंगाबाद समाज मंडळाचा प्रत्येक कार्यक्रम भव्य दिव्य असतो… मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! ??
अभिनंदन औरंगाबादकर