श्री.अरविंद बाबुलाल बडगुजर-आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी – श्री. सुनिल कोतवाल, कुर्हे पानाचे

बोराडीकर श्री.अरविंद बाबुलाल बडगुजर, हे गेल्या २५ वर्षापासून ‘राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय,कु-हे पानाचे येथे उपशिक्षक या नात्याने विद्यादानाचे कार्य इमाना-इतबारे तथा सचोटीपूर्वक करत आहेत, त्यांच्या ह्या कार्याबद्दल नुकताच ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाला, त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सरांना शिक्षण व्यतिरिक्त खेळात ही रुची आहे. ते एक उत्कृष्ट पी. टी. टिचर म्हणून पण ओळखले जातात. विद्यार्थ्यांना नेहमी शिक्षणाविषयी आणि खेळाविषयी मार्गदर्शन करीत असतात. ते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहतात. त्यांना या पूर्वी 2003 मध्ये जिल्हास्तरीय दादोजी कोंडदेव पुरस्कार पण प्राप्त झाला आहे.

कुर्हे पानाचे येथील श्री. सुनील रघुनाथ कोतवाल तथा समस्त समाज बांधवांनी त्यांचे कार्याचा यथोचीत गौरव करणेचा मानस व्यक्त केला आहे. अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर्स प्राऊड गृप, वेब पोर्टल टिम तथा समस्त बडगुजर समाजातर्फे श्री.अरविंद सरांचे हार्दिक अभिनंदन व यापुढेही विविध पुरस्काराने सन्मानीत होणे संबंधीच्या शुभेच्छाl.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*