कलाशिक्षक हेमंत निंबा बडगुजर यांना ‘आदर्श कलाध्यापक पुरस्कार – २०१९’ व ‘स्नेहबंध कलारत्न पुरस्कार – २०१९’ पुरस्कार जाहीर – श्री. स्वानंद सुरेश बडगुजर

हार्दिक अभिनंदन कलाशिक्षक हेमंत निंबा बडगुजर रा विद्यालय कुऱ्हे पानाचे तालुका भुसावळ

आपल्या सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की धुळे जिल्हा कलाध्यापक वेल्फेअर सोसायटी च्या वतीने दरवर्षी आदर्श कलाध्यापक पुरस्कार दिले जातात. यावर्षी आपल्या समाजातील कलाशिक्षक श्री. हेमंत निंबा बडगुजर, राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय, कुऱ्हे पानाचे तालुका भुसावल यांची ‘आदर्श कलाध्यापक पुरस्कार – २०१९’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आपल्या विषयात नैपुण्यता आणून विद्यार्थ्यांना समाजाला एक आदर्श निर्माण केल्याबद्इ धुळे जिल्हा कलाध्यापक वेल्फेअर सोसायटी च्या वतीने त्यांचा हा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या भावी वाटचालीस प्रेरणा मिळण्यासाठी तसेच त्यांचे यश, कीर्ती सर्वदूर आपल्या कला सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात दरवळत राहाण्यासाठी हा विशेष पुरस्कार शुक्रवार दि. ६ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी १२ वा. प्रा. आर. ओ. निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज, गोंदूर-मोराणे बायपास रोड, गोंदूर, धुळे येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात येणार आहे.

तसेच हेमंत बडगुजर सरांना, स्वर्गीय हरिश्चंद्र गायकवाड बहुउद्देशीय समाज सेवा संस्था, भोसे ता. पंढरपूर जिल्हा – सोलापूर यांचेकडून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्नेहबंध कलारत्न पुरस्कार – २०१९ दिनांक 6 ऑक्टोंबर २०१९ रोजी सोलापूर येथे देण्यात येणार आहे. तिथे सुशील कुमार शिंदे व सोलापूर येथील वरिष्ठ सन्माननीय व्यासपीठावर सरांनी केलेला कार्याचा गुणगौरव होणार असून सरांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक व बडगुजर समाज यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेले आहेत.

सरांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. हेमंत सरांना कला क्षेत्रासाठी आणि समाजकार्यासाठी आतापर्यंत बरेचसे या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. सर सदैव समाजकार्यात तसेच शैक्षणिक कार्यात अग्रेसर भूमिका बजावतात. सर, आपला आम्हाला सर्वांना अभिमान आहे, आपण एक नवीन आदर्श युवकांसमोर आपल्या कार्यातून ठेवत आहात. यातून अनेकांना समाजकार्य करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या या अनमोल कार्यास आमुचा सलाम आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*