शिक्षक दिन विशेष लेख :
असा हा शिक्षक दिन… श्री. हेमंत निंबा बडगुजर सर. रा. धो. मा. विद्यालय, कुर्हे पानाचे
जो शिळे शिकवी जगाला, जन्म धन्य समजावा.
तज्ञ मार्गदर्शक आदर्श शिक्षक अखंड चिंतन, मनन डॉक्टर राधाकृष्णन.
असा हा शिक्षक दिन…
वतन भूमी ती तिरूत्तानी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्हा ऋषितुल्य व्यक्तिमत्व.
वीर सामेह पिता, माता सीतम्मा.
असा हा शिक्षक दिन…
ख्रिश्चन धर्माचा प्रचार, बायबल वर्ष चार, हुरीस कॉलेज वेल्लोर, उंचावला तत्व शिखर,
विश्वविद्यालय कुलपती, थोर तत्वज्ञ, सुसंस्कृत सभ्य राष्ट्रपती, शिक्षण तज्ञ
असा हा शिक्षक दिन…
१९५८ साली भारतरत्न सर्वोच्च पद, ग्रंथ प्रचलित गौतम दी बुद्ध धम्मपद, हिंदू संस्कृतीचे सदभाग्य, भाष्यकार जगी निरोप घेतला १९७५
असा हा शिक्षक दिन…
जगी वंदनीय गुरु, गुरु जगाला तारू,
गुरुः र्ब्रह्मा गुरुः र्विष्णु गुरुः र्देवो महेश्वरा, जन्मदिन माझा करावा शिक्षक दिन साजरा.
असा हा शिक्षक दिन…
असा हा शिक्षक दिन…

लेखन – श्री. हेमंत निंबा बडगुजर सर, रा. धो. मा. विद्यालय, कुर्हे पानाचे

Leave a Reply