???”पोळा”??? – बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा – प्रा. सी. डी. साळुंखे,धुळे.

???”पोळा”???
सर्ज्याराजाचा सण आज पोळाl
खुषीत आहे आमचा बळीराजाll
शिंगाना लावाया हो रंगl
बळीराजा होई हो दंगll
पाठीवरती रंगीबेरंगी झूलl
शेजारीपाजा-यांना पाडेल भूलll
दारोदार जाईल आज सर्जाराजाl
सर्वत्र त्याचाच गाजावाजाll
गृहिणी करेल आज पुरणपोळीl
खाऊनी घास भरेल पोटाची झोळीll
बळीराजा अपेक्षितो भरपूर शेतमालl
थांबवाया त्याच्या लेकरांचे हालll
बळीराजाचे हाती विजयी मशालl
तरच राहिल भारत देश खुषालll
~~~~~~
प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
———————–

प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*