शिरसाड येथे ५८ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात खत टाकताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शरद फकिरा बडगुजर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शिरसाड येथील शेतकरी कै. शरद फकीरा बडगुजर हे बुधवारी शिरसाड शिवारातील आपल्या शेतात कपाशीच्या पिकाला युरीया टाकण्यास गेले होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. यामुळे ते जमीनीवर कोसळले. हा प्रकार समजताच सरपंच गोटू सोनवणे, निर्मल पाटील, चंद्रकांत बडगुजर, जगदिश बडगुजर, सुरेश बडगुजर यांनी त्यांना शेतातून यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. गुरूवारी २९/८.१९ रोजी सकाळी १० वाजेला शिरसाड गावात अंत्यसंस्कार करण्यात आला.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!अ.भा.बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ. भा. बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, बडगुजर दर्शन,आणि समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।


Leave a Reply