कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी हे रोज आपले स्वच्छ आरोग्य धोक्यात टाकून लोकांच्या घरातील घाण केरकचरा उष्टे अन्न आदि सर्व घेऊन जात असतात. त्यांच्या आरोग्यावर प्रशासन किंवा इतर कोणीही लक्ष देत नाही. कल्याण येथील आपले समाजबांधव माऊली मेडिकल चे प्रोप्रायटर यांनी स्वतः पुढाकार घेऊन, स्वखर्चाने सफाई कामगारांना तोंडाला लावण्यासाठी 20 मास्क 100 नग हॅन्ड ग्लोज, लाईफ बॉय सनीटायझर चे वाटप केले. सफाई कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. अशा या उदार दातृत्वा बद्दल श्री. अमोल भाऊंचे युवक समिती आणि प्राऊड ग्रुप तर्फे खूप खूप अभिनंदन.
धन्यवाद.
बातमी संकलन – श्री. प्रणव कोठवाल सर, फागणे



Leave a Reply