शाडू मातीची गणेशमूर्ती म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल-रविंद्र बडगुजर

शाडू मातीची गणेशमूर्ती म्हणजे पर्यावरण
संवर्धनासाठी एक पाऊल-रविंद्र बडगुजर
नंदुरबार-पर्यावरण संवर्धनाबाबतचे एक पाऊल म्हणून आपण शाडू मातीचा पर्यावरण पूरक गणपती तयार करुया. आम्ही शहादा येथे गेल्या पाच वर्षापासून शाडू माती, कागदाचा लगदा व नारळाच्या कुच्च्या तसेच पावित्र्याचे प्रतिक म्हणून त्यात पंचामृत, पंचगव्य, गंगाजल, भगवतांचे अभिषेक जल टाकून गणेश मूर्ती बनवित आहोत. आपण दुसर्‍यांना सांगणे किंवा दुसर्‍यांनी आपल्याला सांगणे नको म्हणून आपल्यापासून सुरुवात करुया, असे प्रतिपादन रविंद्र बडगुजर यांनी केले.
येथील बडगुजर समाज उन्नती मंडळ व आई चामुंडा फाऊंडेशन नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आपला गणपती आपल्या हाताने बनवूया आणि पर्यावरण रक्षण करूया या उपक्रमांतर्गत येथील जगताप मॅरेज लॉन्सवर शाडू मातीचा गणेश मूर्ती बनविण्याची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ३७ मुलांसह पालकांनी शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविल्या. यावेळी कायशाळेत शहादा येथील प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून रविंद्र मोहन बडगुजर व सौ.रोहिणीताई रविंद्र बडगुजर हे उपस्थित होते. उन्नती मंडळाचे अध्यक्ष विजय बडगुजर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता बडगुजर, सचिव रेणूका बडगुजर, पंडीत बडगुजर, भाईदास बडगुजर, भटू जगन्नाथ बडगुजर, देविदास बडगुजर, दिनेश बडगुजर, विजय जगन्नाथ बडगुजर, पंकज प्रभाकर बडगुजर, सौ.सुनिता दिनेश बडगुजर, सौ.शुभांगी दिलीप बडगुजर, सौ.मनिषा विजय बडगुजर, सौ.निशा देविदास बडगुजर, सौ.सुनिता पंकज बडगुजर, सौ.अनिता भटू बडगुजर, सौ.राधा विजय बडगुजर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप बडुगजर यांनी केले. कार्यशाळेस जगताप लॉन्सचे संचालक नितीन जगताप, पंकज मराठे तसेच प्रताप जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*