धरणगाव येथील श्री प्रकाश बडगुजर सर यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


“””””””””””””””””””””””””””””
जळगाव (प्रतीनिधी) गिरणा गौरव प्रतिष्ठान व एस.के.डी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या साने गुरुजीआदर्श शिक्षक पुरस्कार यंदा जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या आदर्श शिक्षकांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती चँरीटेबल ट्रस्ट चे चेअरमन संजय देवरे व गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली येत्या 31 डिसेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण जळगाव येथे विशेष मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। या पुरस्कारात शुभांगी भोईटे (चोपडा) नितीन सोनवणे (चोपडा) संदीप पाटील ( जामनेर) मंगला धनुरे (जामनेर) प्रकाश बडगुजर (धरणगाव) ज्योती राणे (धरणगाव) दीपक पाटील (पारोळा) रोहिदास पाटील (चाळीसगाव) धोंडीराम मोरे (चाळीसगाव ) मनीषा महाजन( रावेर) सुभाष महाजन (रावेर) शांताराम तायडे (बोदवड) अजय वाघोदे बोदवड पोर्णिमा फेगडे (भुसावळ) संजय चाळसे (भुसावळ) रणजित शिंदे (अंमळनेर) गायत्री देसले ( अमळनेर) शामकांत रुले (मुक्ताईनगर) मनोज लुल्हे (मुक्ताईनगर) अश्विनी कोळी (यावल) सलीम तडवी (यावल) मनोज कुमार जैन (एरंडोल) लक्ष्‍मण कोळी (एरंडोल) सुवर्ण महाजन( पाचोरा) कोमलसिंग राऊंळ (पाचोरा) प्रवीण पाटील (जळगाव) प्रवीण चौधरी (जळगाव) मनीषा अहिरराव भडगाव अरुण पाटील (भडगाव) संगीता पाटील (भडगाव) आदी आदर्श शिक्षकांची साने गुरुजी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे तसेच जळगाव मधील आदर्श शाळाचाही या वेळी हा सन्मान देण्यात येणार आहे यात जि. प.शाळा आंबे वडगाव( पाचोरा ) जि. परिषद शाळा वराड (चोपडा) जिल्हा परिषद शाळा (नवी दाभाडी) तालुका (जामनेर) जिल्हा परिषद शाळा निंभोरा तालुका (धरणगाव ) जि प शाळा कुसुंबा तालुका (रावेर )जि प शाळा शेलवड तालुका (बोदवड) जि प शाळा शिंदी तालुका( भुसावळ) जि प शाळा जवखेडा तालुका (अमळनेर )आदी शाळांचाही या पुरस्कारासात समावेश करण्यात आला आहे .
“””””””””””””””””””””””””””””

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*