“आज आत्मे हुतात्म्यांचे बोलू लागलेत……”!
१९४७चा १५ आॕगस्ट गेला!
१९८३चा १५आॕगस्ट गेला!!
२०१८चा १५आॕगस्ट गेला!
पण स्वातंत्र्य कुठे आहे?
स्वराज्य कुठे आहे? सत्याग्रह पाहिला,आग्रह पाहिला!
पण गांधीजी कुठे आहेत?
गांधीजी कुठे आहेत?
सरदार पाहिलेत,भाई पाहिलेत!
पण वल्लभभाई कुठे आहेत?
वल्लभभाई कुठे आहेत?
पुढारी मिळाले,नेते मिळाले!
पण नेताजी कुठे आहेत?
नेताजी कुठे आहेत?
खाबूगिरी वाढली,बाबूगिरी वाढली!
पण बाबू गेनू कुठे आहे?
बाबू गेनू कुठे आहे?
कुमार पाहिला,राजकुमार पाहिला!
पण शिरीषकुमार कुठे आहे?
शिरीशकुमार कुठे आहे?
धर्मवीर झाले कर्मवीर झाले!
पण वीर सावरकर कुठे आहेत?
वीर सावरकर कुठे आहेत?
घटना झाली,घटना दुरूस्ती झाली!
पण,
घटनाकार आंबेडकर कुठे आहेत?
आंबेडकर कुठे आहेत?
गुरु मिळाले,गुरुवर्य मिळाले!
पण साने गुरुजी कुठे आहेत?
साने गुरुजी कुठे आहेत?
मिलपती झाले,कुलपती झालेत!
पण छत्रपती कुठे आहेत?
छत्रपती कुठे आहेत?
जनमान्य झाले,मनमान्य झाले!
पण लोकमान्य कुठे आहेत?
लोकमान्य कुठे आहेत?
दंगे पाहिले,धोपेही पाहिले!
पण शांतता कुठे आहे?
शांतता कुठे आहे?
दुःख पाहिले,सुखही पाहिले!
पण समाधान कुठे आहे?
समाधान कुठे आहे? शिष्ठाचार पाहिला,सदाचार पाहिला
पण शिस्तता कुठे आहे?
शिस्तता कुठे आहे?
———————–
प्रा.सी.डी.साळुंखे, धुळे.

Really very nice composition sir.