26 व्या राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत कु. पायल जितेंद्र बडगुजर हिला सिल्वर मेडल

मुर्तीजापुर येथून जवळ असलेल्या कारंजा या ठिकाणी 26 व्या राज्यस्तरीय सब जूनियर सोफ्टबॉल अजिंक्य स्पर्धांचे आयोजन दिनांक 10 ते 12 ऑगस्ट या दरम्यान करण्यात आलेले होते. या स्पर्धेमध्ये भ. गो. शानबाग या विद्यालयाची विद्यार्थिनी कु.पायल जितेंद्र बडगुजर हिला सिल्वर मेडल देऊन गौरवण्यात आले. सदरची स्पर्धा महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप आणि वाशिम जिल्हा सोफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेली होती.

सदरच्या खेळात एकूण 12 ते 15 खेळाडू खेळत असतात. या खेळात क्रिकेट खेळाप्रमाणे बॉलरचे सुद्धा कार्य असते. कु. पायल ने उत्कृष्ट फ्रिजर म्हणून, बॉलर म्हणून, आपल्या संपूर्ण टीमला यश मिळवून दिले. तीच्या उत्कृष्ट कार्यामुळे या संघाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तर पायल जितेंद्र बडगुजर हिला सिल्वर मेडल देऊन उत्कृष्ट प्रिचर म्हणून ,बॉलर म्हणून, सन्मानित करण्यात आले.

कु.पायल ही सौ. चेतना व श्री. जितेंद्र उत्तमराव बडगुजर राहणार जळगाव यांची जेष्ठ कन्या आहे. श्री जितेंद्र बडगुजर हे जळगाव येथील अजिंठा एसटी वर्कशॉप मध्ये कार्यरत आहेत. त्यांचे मूळ गाव यावल असुन त्यांना पायल आणि विपुल अशी दोन मुले आहेत.विपुल हा इयत्ता सातवी मध्ये, तर पायल ही इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे. सदरच्या सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी तिला शाळेतील क्रीडा शिक्षक श्री. केतन कोल्हे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याच स्पर्धेमध्ये अंपायर म्हणून कांचन विलास बडगुजर यांनी काम पाहिले.

कु. पायल हिने सॉफ्टबॉल खेळण्यास इयत्ता पाचवी पासून सुरुवात केली. तिचा या खेळातील आलेख हा चढता असून ,आज पर्यंत तिने 2 गोल्ड, 5 सिल्वर ,तर 3 ब्राँझपदक ,तसेच प्रमाणपत्रे प्राप्त केलेली आहे. आज पर्यंत जवळपास 35 ते 40 स्पर्धांमध्ये भाग घेऊन, तिने हे यश प्राप्त केले आहे .इंदूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धे पासून तिने आपल्या कार्यास सुरुवात केली .ती आजपर्यंत जळगाव ,नाशिक, यवतमाळ ,नागपूर, चाळीसगाव, औरंगाबाद, मुंबई ,दिल्ली, या ठिकाणच्या स्पर्धेमध्ये तिने आपले यश अजमावले आहे. तिच्या यशामुळे तिचे समाजातील सर्व घटकांकडून कौतुक केले जात आहे .शासकीय आदेशानुसार तिला या यशाचा फायदा इयत्ता दहावीच्या गुणांमध्ये वाढ होण्यासाठी निश्चितच होणार आहे. समाजातील मुला-मुलींनी तिच्या यशातून प्रेरणा घ्यावी व आपला नावलौकिक वाढवावा ही विनंती.

शब्दांकन: प्रा. मिलिंद बडगुजर

4 Comments

  1. सुकुमारी *पायल जितेंद्र चेतना बडगुजर* जळगाव यांचे क्रिडा विश्वातील सफलतेबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
    मान.प्रा.मिलिंद बडगुजर सर यांनी खुप छान लेख लिहिला. सरांच्या लेखणीला शुभेच्छा!/ डाॅ.
    दिलीप धोंडू बडगुजर -सौ.स्वाती बडगुजर,अमरावती

  2. Very nice…,
    Congratulations and best of luck to payal on his achievements and to be continued to get it.

    We all Badgujars are proud of your✌ success.

Leave a Reply to डाॅ.दिलीप बडगुजर Cancel reply

Your email address will not be published.


*