अ. भा.बडगुजर समाज शिक्षण समिती चा विद्यार्थी गुणगौरव सोहळा भुसावळ येथे उत्साहात संपन्न

दिनांक 4 आगस्ट 2019 ला आखिल भारतीय बडगुजर महासमिती अंतर्गत शिक्षण समिती व बडगुजर विद्याप्रसारक मंडळ जळगाव आणि बडगुजर समाज जागृती मंडळ भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी चे कौतुक करून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले असा हा सोहळा भुसावळ नगरीत मोठ्या उत्साहात पार पडला.
‌ या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, ठाणे या जिल्हयातील आणि मध्यप्रदेश,गुजरात येथील तालुका आणि लहान मोठ्या गावातुन गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थितत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष श्री.उमेशआप्पा करोडपती होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री.संजयभाऊ सावकारे आणि भुसावळ नगरीचे नगराध्यक्ष श्री.रमणभाऊ भोळे हे होते .त्याच प्रमाणे उपनगराध्यक्ष श्री.युवराजभाऊ लोणारी,भुसावळ शिक्षण समितिच्या सौ.मंगलाताई आवटे, प्राध्यापक डॉ.सुनीलभाऊ नेवे हे मान्यवर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम लोणारी मंगल कार्यालय येथे आयोजित केला गेला होता.
‌ कार्यक्रमाची सुरुवात हि दीप प्रज्वलन आणि माँ चामुंडा माता प्रतिमा पूजनाने झाली समितीचे प्रमुख श्री पी डी बडगुजर सर यांनी प्रास्ताविक केले, नंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते,बडगुजर समाजातील मानवारांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी सुरुची भोजनाचे आयोजन भुसावळ बडगुजर समाजाच्या वतीने करण्यात आल होतेे.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव आणि बडगुजर समाज जागृती मंडळ भुसावळ यांचे सदस्यांनी अथक परिश्रम घेतले आणि मोठ्या उत्साहात हा गुणगौरव बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*