बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे रविवारी विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम नंदुरबार-येथील बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही दि.२८ जुलै रविवार रोजी बडगुजर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात दि.२८ जुलै २०१९ रविवार रोजी दुपारी २.३० वाजता बडगुजर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, समाजातील पदोन्नती, सेवानिवृत्त तसेच विशेष प्राविण्यप्राप्त समाज बांधवांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.चंदक्रांत रघुवंशी हे असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.ब.समाज महासमितीचे उपाध्यक्ष भगवान लक्ष्मण बडगुजर, रिलायंस जिओ इन्फोकॉम लि.मुंबईचे व्हा.प्रेसिडेंट दिनेश भगवान बडगुजर, मुंबईचे उद्योजक सतिष डिगंबर बडगुजर, नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल डिगंबर नंदवाळकर, बडगुजर उत्कर्ष मंडळ, मुंबई सचिव रमाकांत पुंडलिक बडगुजर, औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल रमेश बडगुजर, धुळे युवक समितीचे अध्यक्ष अनिल जगन्नाथ बडगुजर, धुळे युवक समितीचे सदस्य गोकुळ हिम्मत बडगुजर हे उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे करण्यात आले आहे.


शुभेच्छा!