‼✨‼✨‼✨‼✨‼✨‼
बडगुजर समाज सरस्वती मिशनतर्फे
त्रिराज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारोहाचे आयोजन २८ जुलैला…!
‼✨‼✨‼✨‼✨‼✨‼
धुळे – बडगुजर समाज सरस्वती मिशन बहुद्देशीय संस्थेमार्फत मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश त्रिराज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारोहाचे आयोजन करण्यात येणार असून बडगुजर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक बरोबर मार्गदर्शनाचा ही लाभ यातून मिळणार आहे.
बडगुजर समाजातील *महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या तिन्ही राज्यातील गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी* व आगामी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
*तिन्ही राज्यातून येणाऱ्या पात्र व कार्यक्रम स्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला 1000 रु रोख रकमेचे पारितोषिक, प्रमाणपत्र, प्रेरणाचिन्ह, भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात येणार आहे.*
*त्रिराजतस्तरीय बक्षीस वितरण समारोह रविवार दि.२८ जुलै २०१९ रोजी रचना हॉल, प्रकाश टॉकीज जवळ, पारोळा रोड,धुळे येथे सकाळी 10 वाजता होईल.*
समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बडगुजर समाज सरस्वती मिशनतर्फे करण्यात येत आहे.
सौजन्य मंडळे:-
क्षत्रिय बडगुजर समाज शिक्षण संस्था, धुळे
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई
जळगाव जिल्हा बडगुजर समाज विकास संस्था, जळगाव
बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद
बडगुजर समाज जागृती मंडळ, भुसावळ
श्री चामुंडा माता बहुउद्देशीय संस्था, जळगाव
नवोदय बडगुजर समाज विकास संस्था, फागणे
टीप: वरील सर्व मंडळांनी समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना एकत्र आणून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने कार्यक्रमास सौजन्याने हातभार लावण्यासाठी तयारी दर्शविलेली आहे.

Leave a Reply