
चामुंडा माता युवक मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष, माजी विरोधी पक्षनेते, नाशिकचे लाडके नगरसेवक माननीय श्री. सुधाकर भाऊ बडगुजर यांना नाशिकच्या काकासाहेब सोलापूरकर सेवाभावी संस्था व श्री संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर नाशिक भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकरराव बर्वे व गणेश बर्वे यांनी सोमवारी (ता.1 जुलै) पुरस्कार जाहीर केले. गेल्या पंचवीस वर्षापासून आदर्श नगरसेवक, सहकार, शिक्षणीक, शासकीय, सामाजिक, साहित्यिक, वैद्यकीय अदी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो.
नाशिक शहरात दिलेले योगदान व केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल, मा. श्री सुधाकर भाऊ बडगुजर यांना “आदर्श नगरसेवक” पुरस्कार घोषित झाला आहे.
आपण,नाशिक शहरा साठी दिलेले योगदान, म.न.पा. मध्ये केलेल्या भरीव, उल्लेखनीय व खडतर कामगिरीचा झालेला हा सन्मान प्रत्येक समाज बांधवांना अभिमानास्पद आहे. आपल्या कडून उत्तरोत्तर अशीच उत्तम कामगिरी पार पडो व आपणास यश मिळत रहो अशी परमेश्वरा चरणी प्रार्थना.

नाशिक नगरी साठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी साठी, आदर्श नगरसेवक मा. श्री. सुधाकर भाऊ बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारा प्रसंगी उपस्थित मान्यवर श्री. दिपक जिवराम बडगुजर, अध्यक्ष श्री. संदिप भाऊ दोडे, उपअध्यक्ष, श्री. संतोष भिला बडगुजर, जेष्ठ समाजसेवक, श्री. प्रभाकर ( अण्णा) बडगुजर, नाशिक येथील प्रगतीशील उद्योगपती, श्री. सुधीर भाऊ बडगुजर, नाशिक येथील प्रगतीशील उद्योगपती, श्री. अनिल भाऊ बडगुजर, श्री. दिपक भाऊ बडगुजर, पंचवटी विभाग प्रमुख, श्री. राजेंद्र बडगुजर, सिडको विभाग प्रमुख, श्री. संजय नंदवालकर, जेष्ठ समाजसेवक, श्री. पवार साहेब, श्री. संदिप भाऊ कोतवाल, श्री. प्रशांत बडगुजर सर, श्री. मनोहर चव्हाण, श्री. योगीराज बडगुजर, श्री. भगवान बडगुजर, श्री. ज्ञानेश्वर भेरडे, श्री. गोपीशेठ बडगुजर, व पदाधिकारी सदस्य यांच्या सानिध्यात आनंदात साजरा करण्यात आला.

Leave a Reply