लग्नानंतरही उच्चशिक्षण घेऊन समाजापुढे ठेवला आदर्श सौ कल्याणी कुणाल बडगुजर

अभिनंदन … कल्याणी सौ. कल्याणी कुणाल बडगुजर यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ द्वारा आयोजित एमबीए (वित्त) परीक्षा ६४% गुणांसह उत्तीर्ण केली आहे.त्यांनी ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण केली व आपला केजी ते पीजी पर्यंत उच्च शैक्षणिक दर्जा कायम राखला आहे. बडगुजर समाजात उच्च शैक्षणिक मेरिट असणारी अगदी थोड्या मुलींमध्ये त्यांनी जागा मिळविली आहे .

विशेष म्हणजे त्यांना हे यश विवाहानंतर दुहेरी जबाबदारी पेलत मिळवले आहे.कल्याणी हि जळगाव येथील कमलाकर कोतवाल यांनी नात, धुळे येथील हरिश्चंद्र बडगुजर यांची मुलगी आणि बोदवड येथील भास्कर बडगुजर यांची सून आहे. तिने मिळवलेल्या या यशात या सर्वांचे महत्वाचे योगदान व मार्गदर्शन आहे.

कल्याणी यांनी पदवीचे शिक्षण बिसनेस मॅनेजमेंट मध्ये धुळे येथील एम डी पालेशा कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये पूर्ण केले. कल्याणी यांचे पती मि. कुणाल बडगुजर हे पण उच्च शिक्षित असून त्यांनी सिविल इंजिनीरिंगची पदवी बारामती येथील एस वि पी एम कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, पुणे युनिव्हर्सिटी येथून घेतली. तसेच त्यांनी पदव्युत्तर शिक्षण कराड येथील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनीरिंग शिवाजी युनिव्हर्सिटी येथे पूर्ण केले.

ते सध्या पुणे येथील रत्नरूप प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये प्लांनिंग इंजिनेर या पदावर कार्यरत आहेत. कल्याणी व कुणाल यांची फॅमिली सध्या आकुर्डी पुणे या ठिकाणी स्थायिक आहे.


सौ. कल्याणी यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड आपले हार्दिक अभिनंदन करत आहे.

1 Comment

  1. सौ.कल्याणी कुणाल बडगुजर यांचे कौतुकास्पद कार्य!
    लग्नानंतर एमबीए केलेबद्दल सौ.कल्याणी यांचे हार्दिक अभिनंदनl
    बडगुजर समाजात लग्नानंतर नव-याने व सासूसास-यांनी इच्छित तरुणींना प्रोत्साहन देणे/परवानगी देणे/मदत करणे सद्यस्थितीत काळाची गरज आहेl

Leave a Reply

Your email address will not be published.


*