दोन दशकातील समाज कार्याचा आढावा–याबाबत माझे मत- श्री सतिश बडगुजर,कल्याण “

“दोन दशकातील समाज कार्याचा आढावा–याबाबत माझे मत-
श्री सतिश बडगुजर,कल्याण “

नमस्कार,
मी सहसा सोशल मिडीयावर प्रतिक्रिया देत नाही. परंतु ज्या वेळी या माध्यमामुळे काही मंडळी संभ्रम निर्माण करतात. अशा वेळी समाजाला सत्य परिस्थिती कळावी आणि संभ्रम दूर व्हावा, यासाठी प्रतिक्रिया देणे गरजेचे वाटते.
गेल्या आठवड्यात उत्कर्ष मंडळाचा त्रोटक आणि चुकीचा इतिहास मांडण्यात आला. वास्तविक जी व्यक्ती मंडळात आहे. किंवा होती. अथवा जी व्यक्ती मंडळाची खर्‍या अर्थाने हितचिंतक आहे, त्याने अन्य ज्येष्ठांशी चर्चा करुन उत्कर्षचा इतिहास लिहीणे योग्य ठरले असते. परंतु तसे न होता. संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य सदर व्यक्तीने प्रसिध्द केल्यामुळे मी तत्कालीन अध्यक्ष असल्याने मला शेकडो फोन आले. त्यात धुळे, जळगांव येथील बांधवांच्या संतप्‍त भावना होत्या. त्यांच्या भावनांचा सन्मान करण्यासाठीच मी काही बाबी थोडक्यात स्पष्ट करत आहे.

  1. उत्कर्षमध्ये असलेली मंडळी ही मुळची जळगाव, धुळे म्हणजेच खानदेश येथीलच आहेत.
  2. ओबीसीसाठी कुणी किती योगदान दिले. हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे तो इतिहास पुन्हा पुन्हा उगाळून समाजात दुफळी निर्माण करणे योग्य नाही.
  3. अखिल भारतीयचे कार्य वर्षानुवर्षे सुरूच आहे. कधी वेगाने तर कधी संथगतीने. त्यात सर्वांचाच मोलाचा वाटा आहे.
  4. उत्कर्षने अखिल भारतीयला केवळ चालना देण्याचा प्रयत्न केला.
  5. सबका साथ समाज का विकास हे सूत्र आम्ही स्वीकारले आहे. त्यामुळे कुणीही गैरसमज करुन घेउ नये. तसेच संभ्रम निर्माण करणार्‍या वृत्तापासून लांब रहावे, यासाठी हा लेख लिहीत आहे.
  6. श्री एस एम बडगुजर ,डोंबिवली, यांनी “दोन दशकातील बडगुजरांच्या समाज कार्याचा आढावा” हा लेख प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी दोन दशकातील ठराविक काही घटनांना त्यांच्या नजरेतून टिपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समाजातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये गैरसमजुती चे वातावरण निर्माण झाले.
  7. त्यांनी या लेखांमधून काही घटना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला असला तरी काही घटना या समाजात आनंददायी वातावरण ठेवण्यात अडसर ठरणार आहेत
  8. त्यांनी असे म्हटले आहे की सन 2006 मध्ये तत्कालीन अध्यक्ष उत्कर्ष मंडळ मुंबई ने ओबीसी सवलतीच्या प्रकरणात लक्ष घातले .त्यासाठी बैठका घेतल्या. त्यातून संघर्ष समितीची स्थापना करण्यात आले. त्यांचे हे म्हणणे अगदी बरोबर आहे
  9. धुळे आणि जळगाव येथील स्थानिक मंडळाशी चर्चा करून vjnt बाबत पाठपुरावा थांबवुन ओबीसीच्या कामकाजाला सुरुवात करण्याबाबत चा प्रस्ताव मी उत्कर्ष मंडळाचा अध्यक्ष असताना २००३ मध्ये मांडला व तो मान्य झाला
    10 .त्यावेळी ओबीसी कृती समितीची स्थापना करण्यात आली होती व त्या कृती समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी बडगुजर समाजाने माझ्यावर टाकली. आणि संपूर्ण समाजाने दिलेल्या सकारात्मक पाठिंब्याच्या जोरावर कोणाकडून आर्थिक मदत न घेता या प्रकरणात आपल्याला यश मिळाले याबाबत मला मत मांडण्याची गरज नाही कारण त्यावेळी जे समाज बांधव या प्रक्रियेत होते त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे
    11 .त्यांनी जो लेख लिहिला तो त्यांच्या नजरेतून लिहिला आहे पण ज्या गोष्टी त्यांच्या अधिकार क्षेत्रात नाही ,ज्याचे ते साक्षीदार नाही, अशा घटना चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा त्यांचा हेतू काय हे मात्र कळले नाही. त्यामुळे समाजातील ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे म्हणूनच हे लिहिण्याचा निर्णय घ्यावा लागला
  10. त्यांनी असे म्हटले आहे की “बडगुजर समाजाची अखिल भारतीय स्तरावर पुनर बांधणी करावी, जीर्ण मोडकळीस आलेली जुनी संस्था बंद करावे म्हणून उत्कर्ष मंडळाने जागोजागी बैठका घेतल्या” हे विधान उत्कर्ष मंडलाबाबत समाजात गैरसमज निर्माण करणारे असून समाज संघटनेत अडथळा आणणारे आहे
  11. खरे म्हणजे अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या पुनर्रचना करण्याच्या कोणत्याही बैठकीत ते उपस्थित नव्हते. पुनर्रचनेबाबत त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी समाजाने टाकलेली नव्हते .ते या प्रक्रियेचा भाग पण नव्हते कोणताही संबंध नसलेल्या गोष्टीवर भाष्य करून समाज सेवा घडत नाही.
    14.त्यावेळी अखिल भारतीय बडगुजर समाज महा समितीतील काही कार्यकारणी सदस्य मयत झालेले होते तसेच घटनेतील काही गोष्टींमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक होते म्हणून त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी धुळे व जळगाव येथील कार्यकर्ते आणि मुंबईचे कार्यकर्ते एकत्र येऊन महासमितीचे पुनर्रचना करण्यासाठी बैठकांचे नियोजन केले होते.
    15 या बैठकांना महासमितीचे तत्कालीन अध्यक्ष श्री. आनंदाभाऊ सूर्यवंशी व सचिव श्री.पंडित शंकर बडगुजर यांच्यासह धुळे- जळगाव मधील व विविध भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठका शिरपूर- धुळे -जळगाव -नाशिक येथे घेण्यात आल्या पण कोणत्याही मीटिंगमध्ये जीर्ण व मोडकळीस आलेली संस्था म्हणून महासमितीला दूषणे लावले गेले नव्हते .महासमिती बंद करण्याचा विषयच नव्हता .त्याचे साक्षीदार महासमितीचे तत्कालीन अध्यक्ष व सचिव आहेत
    16 सर्वांना विश्वासात घेऊन या बैठका घेण्यात आले होते . तात्रिक अडचणी दूर करणे ,घटना दुरुस्ती करणे ,विविध समित्यांची रचना निश्चित करणे, त्या समित्यांची अधिकार व कार्य याबाबत चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात येत होते. परंतु या सर्व गोष्टी करण्यासाठी बराच विलंब होणार होता आणि त्यावेळी समाज संघटन व सामाजिक कार्यक्रमाची गरज ही समाजाची मागणी होती .
    17.त्यावेळी *उपक्रमावर आधारित संघटन करण्याचा निर्णय घेण्यात आला .यातूनच 2006 मध्ये महाराष्ट्र , गुजरात व मध्य प्रदेश त्रिराज्यस्तरीय परिचय महामेळाव्याचे धुळ्यात आयोजन करण्यात आले होते आणि बडगुजर उत्कर्ष मंडळाचा या उपक्रमात सक्रिय सहभाग होता.
  12. हा सर्व प्रपंच मांडण्याचा हेतू आम्ही काय केले ,हे सांगण्याचा नसून ज्या घटनांचे ते साक्षीदार नव्हते ,अशा घटनांवर लेखन करून समाजात गैरसमज निर्माण करून ,दुही पसरविण्याचा प्रयत्न म्हणजे समाज संघटनेला खीळ घालण्यासारखे आहे
    19.त्यांनी लेखाच्या शेवटी म्हटले आहे की हे समाज कार्याचे शिवधनुष्य पेलताना आपापसांत गट ,तट, स्पर्धा यांचा लवलेशही लावून घेऊ नका,असा छान संदेश दिला आहे.पण याची सुरुवात स्वतःपासून झाली तर समाज बांधव तुमचे अभिनंदन करतील.
  13. त्यांनी त्यांच्या लेखातुन त्या पसरवलेला गैरसमज दूर करण्यासाठी हा लेख लिहिला आहे .यावर चर्चा घडवून आणण्याचा किंवा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही

1 Comment

  1. श्री सतिशभाऊ बडगुजर, मुंबई यांनी लिहिलेला खुलासा अगदी वस्तुनिष्ठ आहे.आजकाल काम,योगदान कमी आणि बातम्या, प्रसिध्दी जास्त अशांची संख्या, माध्यमंवर तर खूपच वाढली आहे.ओबीसी घ्या की आखिल भा समितीचे पुनरुज्जीवन घ्या यात सकारात्मक, रचनात्मक भूमिका मुंबई सह सर्व जिल्ह्यांची, तत्कालीन सक्रिय कार्यकर्त्यांची होती. श्रेयासाठी कुणीही ओबीसी लढा दिला नाही. व्यापक समाजहित हाच उद्देश मुंबईसह सर्व कार्यकर्त्यांचा होता. तेव्हाच्या एकजुत्व एक्यभवणेमुळेच हा लढा यशस्वी झाला. मुंबईकरांचे त्यातील सहभाग, मंत्रालयीन योगदान नक्कीच मोठे व महत्वाचे होते. आज एक पत्र दिले की मोठी बातमी होते.यातून काय साध्य होते ते येणारा काळ सांगेल. त्यामुळे दोन दशकांतील वाटचाल हा लेख श्री सतीश बडगुजर यांनी लिहिलेल्या दुरुस्ती सह चाच वास्तव व खरा आहे.दिशाभूल कुणाचीही नको हीच भावना माझ्याही लिखणामागे आहे. शांताराम बडगुजर.

Leave a Reply

Your email address will not be published.


*