चि.सुबोध दिलीप बडगुजर हा बालपणी ग्रामीण भागात शिकला. बालपणीच्या आठवणी सांगायच्या म्हटल्या तर तो गणितात चांगला कुशाग्र बुध्दीचा.त्याचे वाचनही अफाट होते.बालपणीच जयवंत नारळीकर सरांचे ‘आकाशाशी जडले नाते ‘ हा मोठा खगोलशास्त्रावरील ग्रंथ त्याने प्रचंड आवडीने वाचला. खगोलशास्त्रावरील इतरही पुस्तके, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक प्रयोग ,गणित भूमिती वरील इतर पुस्तके या विषयावर त्याचे वाचन व व्यासंग थक्क करणारा आहे. पहिल्या वर्गात असतांना चौथी पाचवीचे गणित त्याला जमे.चौथीत तो आठवी नववीचे गणित सोडवायचा. शालेय अभ्यास करताना आम्हाला तो फार कमी वेळा दिसायचा. (आताही तसेच आहे.) विज्ञान -गणिताच्या संज्ञा त्याला बालपणीच चटकन उमगल्या आहेत. कमी अध्ययन आणि चांगले मार्क्स हे त्याचे वैशिष्ट्य.
जवाहर नवोदय विद्यालय अमरावती येथे त्याचे सहावी ते दहावी शिक्षण झाले.दहावीत असताना दक्षणा फाउंडेशन (USA ) ची परीक्षा अव्वल गुणांनी उत्तीर्ण करून त्याने ती स्कॉलरशिप पटकावली. त्या नुसार अकरावी व बारावी विज्ञान व AEEE चे क्लास पुणे येथे झाले. VNIT नागपूर येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेऊन बी टेक झाला. आता भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर ला सायंटिफिक आॅफिसर म्हणून त्याची निवड झालेली आहे.
याचा आनंद झालेला आहे. तो अत्यंत संवेदनशील,सामाजिक प्रेमळ व हसमुख व्यक्तीमत्वाचा मुलगा आहे. प्रामाणिकपणा ,खिलाडूवृत्ती हे त्याचे वैशिष्ट्य!त्याच्या सोबत साधणे कुणालाही आवडेल. विनोदी वृत्तीने तो वातावरणातील ताणतणाव ही कमी करतो. हजरजबाबी पण मन न दुखवता बोलणे हे गुण त्यांचेकडून शिकावे.
सौ.स्वाती-डाॅ.दिलीप बडगुजर
अमरावती
??हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन! ??
डॉ. श्री.दिलीप व सौ. स्वाती दिलीप बडगुजर यांचे चि.सुबोध दिलीप बडगुजर यांचे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (BARC) येथे scientific officer या पदी निवड झाल्या बद्दल
ओबीसी समिती प्रमुख व उप प्रमुख, अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप यांचे कडून चि.सुबोध व परिवारासह यांना हार्दिक अभिनंदन! आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ????


हार्दिक अभिनंदन चामुंडा युवक मित्र मंडळ नाशिक तर्फे
वाव्व्!
सर केले भाभा आॕटोमिक रिसर्च सेंटरl
चि.सुबोध शोभे सायंटीफिक आॕफिसरll
भाग्यवान पिता डाॕ.दिलीप अन् माता सौ.स्वातीl
चि.सुबोधने भाभा आॕटो.सेंटर गाठूनी वाढविली किर्तीll
चि.सुबोध व मातापित्याचे हार्दिक अभिनंदनll
वेब पोर्टल
अशा उपक्रमांची समाजहित कार्याकडे वाटचाल !
शुभेच्छा!