अमरावती उमंग बडगुजर नारीमंच चा कलागुणांना वाव देणारा समर कॅम्प यशस्वीरीत्या संपन्न

अमरावती उमंग बडगुजर नारी मंच चा सामाजहीतोपोयोगी अनोखा समर कॅम्प फक्त समाजातील महीला व लहान मुले व मुलींसाठी पहील्यांदा आयोजित करण्यात आली ह्या कॅम्प चे विषेश बाब ही समर कॅम्प अगदी फ्री होता. सर्व बडगुजर महिलांनी या मध्ये हिरिरीने सहभागी होऊन रांगोळी, मेहंदी ,पेंटिंग, हेअर स्टाईल, शॉर्ट मेकअप ,सारी रॅपिंग ,डान्स हे वर्कशॉप घेण्यात आले. सर्व बडगुजर महिला व मुलींना एकत्र आणून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा या समर कॅम्प उद्देश होता. त्याच प्रमाणे आपल्या समाजातील व्यक्तींकडून वर्कशॉपचे प्रशिक्षण देण्यात आले.सौ.वैष्णवी दोडे व सौ. सारिका अतुल भेरडे यांनी रांगोळीचे प्रशिक्षण दिले. तुषार पचलोड यांनी मेहंदी चे प्रशिक्षण तसेच आराध्या रामसे यांनी मेकअप हेअर स्टाईल याचे प्रशिक्षण व प्रतीक भिडे यांनी डान्स चे प्रशिक्षण दिले हा कार्यक्रम संपुर्ण बडगुजरमय होता शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला शहराच्या उपमहापौर मा.श्रीमती संध्याताई टिकले, नगरसेविका माजी उत्तर झोन सभापती सुरेखा ताई लुंगारे, नगरसेविका स्वाती कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण कार्यकारिणी कार्यकारिणी अध्यक्ष सौ.भारती अजय दातेराव उपाध्यक्ष सौ.राधिका अमर भेरडे सौ.अंजली गोपाल बडगुजर सचिव सौ.सोनिया राहुल भेरडे कोषाध्यक्ष सौ.निलाक्षी नितीन सौ.उमा सारंग अलोणे सौ.पल्लवी ॠशिकेष दातेराव सहसचिव सौ सुनंदा शेखर दातेराव सौ पुजा अनंत देवरे सौ रूपाली अनिरुद्ध भेरडे व सौ आराध्या पंकज रामसे यांनी मेहनत घेऊन समाजहितासाठी एक छान अभिनंदनिय उपक्रम राबविला समाजाचे सर्वस्तरातुन हया कार्यक्रमा संदर्भात सर्व कार्यकारिणी चे कौतुक करण्यात येते विषेशतः अध्यक्ष सौ.भारती अजय दातेराव यांनी भविष्यात असेच समाजात उपक्रम राबवावे व पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन दिले.

बातमी संकलन : श्री. अमर भेरडे सर

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*