दि.26/06/2019 रोजी *धरणगांवात बडगुजर समाजातर्फे सलग दहाव्या वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.* बडगुजर समाजाने बक्षीस वितरण सोहळा घेऊन *समाजाची उज्वल परंपरा* कायम ठेवली. या कार्यक्रमात इ.5 वी ते पदवीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी *तीन वह्या, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प* देऊन गौरवन्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन *श्री.अशोक दौलतशेठ बडगुजर* हे होते. ते सध्या उल्हासनगर येथे वास्तव्य करत असून रेल्वेविभागातुन सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना *आत्मविश्वास व प्रयत्नाच्या बळावर यश कसे मिळवावे* याचे उत्तम मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन *श्री.बाजीराव हुनाशेठ बडगुजर* हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना *शिक्षनाचे धड़े* दिले.
या कार्यक्रमातिल विशेष म्हणजे इ.10 वीतील विद्यार्थिनी *कु.पूनम संजयशेठ बडगुजर* हिला 89.80% मिळाले व इ.12 वीतील विद्यार्थीनी कु. *रोहिणी राजेंद्रशेठ बडगुजर* हिला 75.54% मिळाले. या दोघिंना *प्रत्येकी 501रु., तीन वह्या, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प* देऊन गौरवन्यात आले. *कार्यक्रमात समाजातिलच काही बक्षीस दात्यांच्यामुळे कार्यक्रम खुप जोरदार झाला*. या कार्यक्रमात बडगुजर समाजाचे अध्यक्ष *श्री.मनोहर गंगारामशेठ बडगुजर* व सर्व पंच मंडळ तसेच बडगुजर समाजातील बंधु व बघिनी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चि.रोहित मनोहर बडगुजर यांनी केले.



बातमी संकलन – श्री. रोहित बडगुजर, धरणगांव.

Leave a Reply