? ॥ हृदयांतर ॥?- श्री. एस्. एम्. बडगुजर सर

??।।हृदयांतर ॥??

तात्वीक “भांडण” सर्वांशी होते, पण “शत्रुत्व” कुणाशीचं ठेवू नये.
खरं तर “मतभेद” एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम “भेद” ठेवू नये.
एखाद्याशी “वाद” घालावा, पण वादावादी न करता क्षणात “सुसंवाद” साधवा.

“अहंकार” हाच या सर्वांचं मुळ आहे, तो विनाकारण बाळगुन जगू नये.
शेवटी “मृत्यू” हे सुंदर, शाश्वत “वास्तव” आहे, त्याचे “स्मरण” असावे, “भय” नसावे.
आपण जन्माला आलोय, ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा “आनंद” उपभोग घेण्यासाठी, याचे “स्मरण” ठेवू या.
आपण किती आनंदात आहोत, त्यापेक्षा आपल्यामुळे कितीजण आनंदात आहेत याला खूप महत्व आहे.
“एक हृदय” घेऊन आलोय, जाताना “लाखो हृदयात” जागा करुन जाता आलं पाहिजे.
क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या.?

शुभेच्छूक : एस्.एम्.बडगुजर
??????

2 Comments

  1. श्री.शंकरराव तथा एस्.एम्. भाऊ यांनी “हृदयांतर” म्हणजे काय? अत्यंत सोप्या व सरळ शब्दात पण सद्यस्थितीवर जो प्रकाशझोत टाकला आहे तो वाखाणण्याजोगा तर आहेच पण मैत्री-परीवार-समाजांत गुण्यागोविंदाने रहावयाचे असेल तर कांहिवेळेस मित्र-मित्रासोबत,नाते-नातेवाइकांसोबत आणि समाज कार्यकर्ता-समाजासमवेत” राहतांना मैत्री-नाते-समाजकार्य निभावतांना एखाद-दुसरीकडे वळणे साहजिकच नव्हे तर गरजेचं असतयं. “जसें>मैत्री निभावतांना आपलेपण विसरतां कामा नये तसेंच आपलेपण टिकवितांना मैत्रीत दुरावा येणार नाही हे ही बघणे हितावह असतयंं”.
    टीका-टिपणी करतांना प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनाचा विचार केला पाहिजे हे ही सुज्ञास सांगणे न लगे या न अनेक उक्तींची जाण असली पाहिजे असे ‘हृदयांतर’ वरून जाणवतेll

Leave a Reply

Your email address will not be published.


*