योग व बडगुजर ! – श्री. रमेश वामनराव बडगुजर, ठाणे

  • आज सर्व जगात ५ वा जागतिक योग दिन साजरा होत आहे !
  • योगाला जागतिक वलय मिळून देण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी मा. पंतप्रधान श्नी. नरेद्र मोदी यांची होय !
  • योगाचा व भारताचा प्राचीन काळापासून पासूनचा संबंध राहिला आहे !
  • रामायण ,महा भारताच्या काळात ऋर्षी ,महात्मे हे योग साधना वर्षोनु वर्ष करीत !
    व ही परंपरा आज तागायत सुरू आहे !
  • योगाला सर्व सामान्यां पर्यत नेण्याचे,त्याची ओळख करून देण्याचे कार्य अनेक मान्यवर योगाचार्य करीत आहेत !
  • या मान्यवर योग प्रचारकात, आजच्या योग दिनी ,आपल्या बडगुजर समाजातील योगाचार्याचा परिचय करून घेणे रास्त होईल !
  • खानदेशात व समाजात आदराने ओळखलेजाणारे एक नाव म्हणजे,श्नी.व्ही. आर.साळुंखे तथा आप्पा साहेब विश्वनाथ रामदास साळुंखे ( चोपडे कर/ कांदिवली, मुंबई ) होय !
  • आप्पा साहेब ,विमा उच्च अधिकारी म्हणून १९९० च्या दशकांत निवृत झाले ! मुळातच समाज कार्याचे बाळकडू प्यालेले, आप्पा साहेब स्वस्थ बसणे शक्य नव्हते ! आप्पांनी, मुंबई परिसरात ,ब.स.उ.मंडळ व बडगुजर दर्शन च्या माध्यमातून पुरेपुर समाज सेवा केली ! त्यांच्याच प्रयत्नाने बडगुजर दर्शनच्या प्रकाशना साठी , मा.श्नी. अरूण भाई गुजराथी ( तत्कालीन, अध्यक्ष, महाराष्ट्र विधान सभा ) हे लाभले होते.त्यानंतर २००६ ते २००८ पर्यत, समाजाला ओबीसी च्या मागण्या साठी मंत्रालयात जावे लागले ! तेव्हांही आप्पाची ,अरूणभाईशी भेट घेण्यास मोठी मदत लाभली !
  • समाज कार्या बरोबरच साळुंखे आप्पांनी, योगाचे धडे गिरविले ! निरनिराळया मंडळा तर्फे योगाचे वर्ग सुरू केलेत .खान्देश भुषण,
    योग गुरू कै.निकम गुरूजी ( मुळचे पारोळा जवळील, पोलीस अधिकारी ) यांच्या ठाण्याच्या आश्रमात आप्पांनी योगाचा पूर्ण अभ्यास केला, सराव केला.
  • आज आप्पा सो. मोठं मोठ्या शिबिरात योग शिकवितात ! त्यावर प्रवचण देतात ! असे योगाचार्य आपल्यात असणे ही आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे !
  • ठाणे शहरात राहाणारे,मुळचे पिंम्प्री येथील, पोटाची खळगी भरण्या साठी दिवसभर उन्हा तान्हात,पावसात रिक्षा चालवितात असे श्नी. अशोक त्र्यंबक शेठ बडगुजर !
  • अशोक हे आजारी असायचे.त्यांना असाच एक योग प्रेमी भेटला !त्याचे सांगण्या वरून,फावल्या वेळेत अशोक हे योगाच्या वर्गात जावू लागले !
  • गेल्या १५/२० वर्षात योगाची परिपुर्ण माहिती त्यांच्या संग्रहीत आहे .
    अशोक बडगुजर हे निकम गुरूजी च्या आश्नमा व्दारे योग प्रशिक्षणाचे वर्ग चालवितात !
  • अशोक बडगुजर यांना जेव्हा पहावे तेव्हां सदैव प्रसन्न हास्य चेहरा असतो! हा आत्मीक आनंद , योग साधने मुळे मिळाल्याचे ते सांगतात !
  • योगाचा प्रसार सा-या विश्र्वात करणारे योग गुरू रामदेव बाबा ! आपल्या सर्वांचे परिचयाचे आहेत !
    त्यांनी भारतात ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने योग प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले.
    व ही शिबीरे यशस्वी करण्याची जबाबदारी होती एका बडगुजरा कडे
  • अहमदाबादचे कै.प्रेमचंद पांडुरंग शेठ बडगुजर हे उधोगशील व्यक्तीमत्व ! आजार पणाचा मुळे ,त्यांनी ही रामदेव बाबा कडे योगाचा अभ्यास केला ! त्यांनी रामदेव बाबांच्या मोठं मोठी योग शिबीरात सहभाग घेवून,यशस्वी केली !
  • असे कै्.प्रेमचंद शेठ हे आज आपल्यात नाहीत !
  • त्यांना विनम्र अभिवादन !
  • योगात फक्त पुरूषांची मक्तेदारी असते असे काही नाही ! यात महिलाही आघाडीवर आहेत !
  • डोंबिवली येथील श्री. शंकरराव मोतीराम बडगुजर (एस.एम.बडगुजर ),यांची मुलगी सौ.भारती सुधाकर पाटील हीने नाशिक व रामटेक विद्यापीठातून (चिखलदरा जवळील) योगाचा अभ्यास एम.ए.पूर्ण केला.तीस, योग प्रवीण ही पदवी प्राप्त झाली आहे. सौ. भारती, ऐरोलीतील एका हायस्कूल मध्ये शिक्षिका असून योगाचे वर्ग घेत असतात .त्यांना योग साधने बध्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत !
  • नुकतीच, नवी मुंबई तील सौ. सिमाताई व श्नी दिलीप पंढरीनाथ शेठ बडगुजर या दाम्पत्यां चा,योगा मुळे ग्रिनीज वल्ड बुक आॅफ रेकाड मध्ये समावेश झाल्याची बातमी समजली ! या जोडप्याने वयाच्या ६० व ५५ व्या वर्षी योग,
    सुर्यनमस्कार करून विक्रम केला आहे. या उभयतांचे हार्दिक अभिनंदन !
  • मित्रहो योग कामगिरी सांगत असतांना, अस्मादिक मागे कसे राहातील !
  • २००५ ते २००६ मध्ये मंत्रालय सुरक्षा विभागात नेमणुकीस होतो.सुमारे ३५०/४०० पोलीस अधिकारी, कर्मचारी तेथे कर्तव्यावर असतं ! सांयकाळी ६.०० नंतर मंत्रालयातील मंत्री, अधिकारी निधून जात. त्या नंतर पोलीसांना विशेष काम नसे ! या वेळ बचतीचा फायदा करून घेतला. मोकळ्या हाॅल मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी करीता योग वर्ग एका तासा करीता सुरू केला.दोन माहितगार हवालदार हे प्रशिक्षण देत ! याचा लाभ २५०/३०० अधिका-यांनी घेतला ! या योग वर्गाचे कौतुक तत्कालीन उपमुख्यमंत्री मा.कै. आर
    आर.पाटील साहेब व,अप्परं पोलीस आयुक्त या.श्नी. सुरेंद्रकुमार सो. यांनी केले होते !
  • योग दिना निमित्ताने समाजातील योगचार्याची ओळख करून देण्याचा हा लहानसा प्रयत्न !
  • समाज निरोगी राहण्या साठी ,
  • प्रथम र्निव्यसनी रहा !
  • नियमित योगासने व्यायाम करा !
  • संतुलीत आहार द्या !

आणि ,

*आमचे मित्र महेश जी बडगुजर ,यांनी सांगितलेल्या प्रमाणे,

  • झाडे लावा !
    झाडे जगवा !
  • श्री. रमेश वामनराव बडगुजर ( ठाणे )

1 Comment

  1. श्री.आप्पासाहेब रमेशशेठ यांनी “योग व बडगुजर” या लेखात दिलेल्या माहितीवरून त्यांना बडगुजर समाजाची माहितीचा खजिनदार म्हणावेसे वाटतेl
    ग्रेट आप्पासाहेब सुप्पर

Leave a Reply

Your email address will not be published.


*