21 जून हा दिवस सन 2014 पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. 21 जून 2019 हा पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या योग दिवसाचे औचित्य साधून नंदुरबार बडगुजर समाज महिला मंडळ यांनी दिनांक 17 जून ते 21 जून पर्यंत योग शिबिराचे आयोजन केले होते त्या , शिबिरासाठी नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळाने सर्वतोपरी सहकार्य केले
नंदुरबार बडगुजर समाज महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी समाजात महिलांच्या निरोगी आयुष्यासाठी योग करावा यासाठी आवाहन केले.
नंदुरबार येथील गुरुकुल नगर मधील एंजल स्कूल या ठिकाणी हे युवक वर्गाचे आयोजन करण्यात आले होते योग शिक्षिका सौ शिल्पा श्रॉफ यांनी सर्व महिलांना योगाभ्यासाचे धडे दिले.
दिनांक 21 जून रोजी या शिबिराच्या समारोप करण्यात आला यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्ष यांनी योग शिक्षिका सौ शिल्पा श्रॉफ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
स्तुत्य व अभिनंदनीय कार्यक्रमll