महत्त्व योगाचं… – प्रा. सी. डी. साळुंखे सर

तरुणपणीच हल्ली माणूस
म्हाताऱ्यावानी दिसतं!
पोळ्या खातं कमी,
अन गोळ्या खातं जास्त!!!

कधी तपासा लघवी
कधी तपासा रक्त!
योगासने केलीतर
होणार रोग मुक्त!!

आरोग्य असेल उत्तम
तर उत्साह राहील टिकून!
सूर्यनमस्कार , योगासनं
लवकर घ्या शिकून!!

शरीराची शुद्धी क्रिया
करावीच लागेल!
नसता उगीच Acidity
जळजळ मागे लागेल!!

जो पर्यंत तुम्ही योगासाठी
बाहेर नाही पडणार!
हे दुखतं , ते दुखतं
दिवस रात्र रडणार!!

शरीराची हालचाल बाबा
करावीच लागेल…..
नाहीतर चष्म्याआधी
कंबरेला बेल्ट लागेल!!

पन्नाशीतच गुडघे जर
होणार नसतील फोल्ड
काय करता अंगावरचं
दहा तोळे गोल्ड ?

डॉक्टर म्हणतील गुडघ्याची
बदलून टाका वाटी !
नाहीतर घ्यावी लागेल
हाता मधे काठी!!

तुम्हीच सांगा रडकं तोंड
कुणाला आवडत असतं!
दुःखी , कष्टी माणसा जवळ
कुणीच बसत नसतं!!

प्राणायाम केल्यामुळे
चेहऱ्यावर तेज दिसेल
म्हातापरणी सुद्धा माणूस
हसत मुख दिसेल!

DO DAILLY YOGA

       ? संग्रहित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*