कै. गं. भा. मालतीबाई मधुकर बडगुजर यांच्या उत्तरकार्यात चोपडा समाजबांधवानकडून उत्तम पायंडा पाडण्यात आला

चोपडा –

आज दिनांक 20.6.19 रोजी चोपडा येथे कै. श्रीमती गं. भा. मालती ताई मधुकर बडगुजर यांचे उत्तर कार्यचा कार्यक्रम संपल्यावर तेथे व्यसन मुक्ती चे आवाहन करण्यात आले. जर कोणाला कोणतेही व्यसन सोडायचे असेल तर त्यांनी ते सोडावे.

त्याला प्रतिसाद म्हणून दोन जणांनी व्यसन सोडल्याचे जाहीर वचन दिले. असेच जर प्रत्येक ठिकाणी दोन – चार जण व्यसन सोडू लागलेत तर समाज लवकरच व्यसन मुक्त होईल यात शंका नाहीं.

तसेच नाशिक येथील श्री. सुधाकर किसन बडगुजर, यांच्या कै. श्रीमती. गं. भा. मालती ताई मधुकर बडगुजर ह्या वहिनी होत्या. त्यांची आठवण म्हणून त्यांनी एका झाडाचे रोपटे चोपडा येथे लावले. पुतण्या श्री. नितीन मधुकर बडगुजर यास त्यांनी सांगितले की आईची आठवण म्हणून हे झाड मोठे होईपर्यंत त्याचे संगोपन करणे.

अशा पद्धतीने आज उत्तर कार्याचा कार्यक्रम संपला.

अशा पद्धतीने यापुढे आपल्या समाजात आपण उत्तर कार्याचा कार्यक्रम राबवून व्यसनमुक्ती आणि पर्यावरण वृद्धि करू या…

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*