Pune: श्री. दिलीप पंढरीनाथ बडगुजर व सौ. सीमा दिलीप बडगुजर हे दाम्पत्य मूळचे म्हसावद ता. जळगाव येथील मूळचे राहणारे असून ते केसर ग्रुप या कंपनीत सीनियर मॅनेजर प्रोजेक्ट्स या पदावर कार्यरत होते. या पदावरून निवृत्त होऊन साध्या ते स्वतः चा व्यवसाय करत आहेत त्यांच्याकडे क्रॉस कंट्री गॅस पाईप लाईन चे काम आहे. त्यांचे हे काम पलावा शिळ फाटा ते टाटा पॉवर हाऊस डोंबिवली पर्यंत सुरू आहे.
या बडगुजर दाम्पत्याला योग करण्याची एक आवडच आहे. आणि ही आवड त्यांना लिम्का बुक ऑफ़ रेकॉर्ड मध्ये सहभागी होण्याची संधी घेऊन आली. त्यांच्या योगा मेंटाॅर रुपाली गोयल यांनी श्री. व सौ. बडगुजर यांना योगाथाॅन 2019 मध्ये सहभागी होण्यास प्रेरणा दिली. योगाथाॅन 2019 हा कार्यक्रम कंट्री क्लब अंधेरी प. येथे चेतना गुंडेचा यांनी आयोजित केेेला होता. यात सुमारे 850 लोक सहभागी झाले होते. या सर्वांनी मिळून एक नवा कीर्तिमान स्थापन केला, 108 सुर्य नमस्कारांचे रेकॉर्ड या सर्व लोकांनी प्रस्थापित केले.
श्री. दिलीप बडगुजर यांनी वयाच्या 60 व्या वर्षी व सौ. सीमा दिलीप बडगुजर यांनी वयाच्या 52 व्या वर्षी हे रेकॉर्ड केले. हे सर्व निव्वळ शक्य झाले ते म्हणजे त्यांची रोज योगा करण्याच्या आवडी मुळे – कारण योगा हा असा व्यायामाचा प्रकार आहे ज्याच्या मुळे शरीराचे अंगच नाही तर मन, मस्तिष्क, आत्म्याचे संतुलन केले जाते.

योगा हा आपल्याला लाभलेली एक देणच आहे, जवळपास पाच हजार वर्षांहून अधिक मोठी परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योगा आपल्याला चिरकालीन तरुण ठेवण्यास मदत करतो. योगाची व्याप्ती खूप मोठी आहे. युज् या मूळ संस्कृत धातूपासून तयार झालेल्या योग या शब्दाचा अर्थ “जोडणे’ असा होतो. आपलं शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणे याला योग म्हणतात. आरोग्य या शब्दाची जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली व्याख्या, “शरीर, मने, अध्यात्म आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्ती’ अशी आहे. संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. योग ही अशी निरंतर प्रक्रिया आहे जी कायिक, वाचिक आणि मानसिक या तीनही पातळींवर स्थैर्य प्रदान करून माणसाला सर्वार्थाने निरोगी व चिरतरुण ठेवते.
श्री. व सौ. बडगुजर यांच्या वयाकडे बघून येवढेच वाटते की योग करण्यास वयाचे बंधन नाही व हा एकच असा व्यायामाचा प्रकार असावा ज्याला वयाचे बंधन नसावे. उत्तम आरोग्यासाठी त्यांचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे.
योग करा व तंदुरुस्त रहा, निरोगी राहण्यासाठी योगा करा l


अभिनंदन……
अभिनंदन….
अभिनंदन….