बडगुजर समाजकार्याचा दोन दशकाचा आढावा आणि युवकांचा सहभाग – श्री. एस. एम. बडगुजर – अ. भा. ब. स. महासमिती अंतर्गत ओबीसी समिती उप प्रमुख

महाराष्ट्रातील बडगुजर समाज कार्यात दोन दशकां पूर्वी ,सहसा तरुण वर्गाचा सहभाग फार कमी असायचा ! तेव्हा कार्यकर्त्यांना एक प्रश्न पडायचा कि, समाज युवकांनी, समाजिक कार्यात सहभाग घेतला पाहीजे!

  • महाराष्ट्रात या काळात धुळे ब.स.शिक्षण संस्था ,जळगांव ब.स.विद्या प्रसारक संस्था व मुंबई चे ब.स.उ.मं. कार्यरत होती ! व त्यांचे मार्फत वस्तीगृह मुख्यत: करून चालविली जात होती !
  • सन २००० मध्ये मुंबईच्या ब.स.उ.मं.ने टिटवाळा येथे नवीन वस्तीगृह उभे केले !
  • या काळात, बडगुजर समाजाचा इतिहास प्रसिध्द करण्या साठी मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते.त्या करीता, मुंबई परिसरात ब-याच ठिकाणी बैठका घेण्यात आल्या !
  • या बैठका मध्ये समाज इतिहासा अगोदर, समाजाला तिन्ही राज्यात एकत्र आणण्याचा साठी,समाज विचारांचे आदान प्रदान होण्या साठी, समाजातील सुशिक्षीत महिला,बालक व पुरुष वर्गाला विचार मांडण्याचे हक्काचे ठिकाण पाहिजे,व त्या साठी समाजाच्या मालकीचे वृत्तपत्र सुरू करावे, अशी मागणी पुढे आली ! व या मागणी साठी सर्व थरातून पाठिंबा मिळत गेला !
  • एप्रील २००१ मध्ये वसई येथील, वधू वर परिचय मेळाव्यात प्रथम समाजाचे वृत्तपत्र सुरू करण्यात येणार अशी घोषणा मंडळाने केली !
  • समाजाच्या मालकीचे वृत्तपत्र असावे,ते मंडळा तर्फे चालविण्यात यावे ,व सदर पत्र
    “बडगुजर दर्शन” या नावाने, समाजाचे मुखपत्र राहिलं असे सर्वांनुमते ठरले !
  • या साठी एक कमिटी नेमण्यात आली.या समितीने अभ्यास करुन, निधी जमा केला. जाहिरातदार,वर्गणीदार जमविले. संपादक म्हणून पत्रकारीतेची माहिती असणारे,त्या क्षेत्रातील जाणकार श्री. मदन कौतिक बडगुजर यांची नेमणुक करण्यात आली !
  • २८ एप्रिल २००२रोजी कल्याण येथे, तत्कालीन विधान सभा अध्यक्ष मा. श्री.अरुण भाई गुजराथी यांच्या हस्ते “बडगुजर दर्शन” पाक्षिकाचे प्रकाशन मोठ्या थाटात माटात करण्यात आले!
  • नोव्हेंबर २००२मध्ये बडगुजर दर्शनचा प्रथम दिवाळी विशेषांकांचा दिमाखदार प्रकाशन सोहळा,चोपडा येथे,तेथील स्थानिक बडगुजर समाज मंडळाच्या सहकार्याने आयोजीत करण्यात आला !
  • यानंतर,बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ,मुंबई ने महाराष्ट्र, गुजराथ व मध्यम प्रदेश या तीन राज्यात समाज संघटीत करण्या साठी
    ठिक ठिकाणी, बडगुजर दर्शनचा दिवाळी विशेषांक प्रकाशन व समाजातील गुणवंताना हेरुन त्यांचा गुण गौरव पुरस्कार देवून करण्यास सुरुवात केली !
  • या साठी मंडळाचे कार्यकर्ते पूर्व नियोजना साठी संबंधीत गावी जात. तेथील स्थानिक समाज मंडळाशी चर्चा करुन,त्यांच्याच
    सहाकार्याने कार्यक्रम यशस्वी केलेत !
  • अशा रितीने या तिन्ही राज्यात, ब-हाणपूर, नाशिक, साखळी, कल्याण, पुणे, धुळे, जळगांव, एरंडोल, शिरपूर, डोंबिवली वसई,वर्षी,बोराडी, बडोदा, सुरत,पनवेल,सोनगिर,अंमळनेर,
    बदलापूर,यादि ठिकाणी असे कार्यक्रम ग्रामीण व शहरी भागात घडवून आणले !
  • समाजातील गुणवंत, विद्यार्थी,शेतकरी, उद्योजक, समाजसेवक, साहित्यीक, क्रिडापटू, समाज सेवक, समाज महिला भुषण व समाज जीवन गौरव पुरस्कार देवून गौरव करण्याची प्रथा समाजात प्रथम राबविली आहे !
  • उत्कर्ष मंडळाने या कार्यक्रमा बरोबरच २००५ मध्ये धुळे येथे समाजाचा प्रथम वधू वर परिचय मेळावा यशस्वी करण्यास सर्व प्रकारे सहकार्य केले. व समाजाला नवी दिशा दाखवीली !
  • या नंतर सुध्दा २००९, २०१२, २०१४, २०१६, २०१८ मध्ये धुळे, पुणे, जळगांव येथील वधू वर परिचय मेळाव्यांना उत्कर्ष मंडळाने पूर्ण सहकार्य केले !
  • बडगुजर समाजाची अ.भा.स्थरावर पुर्नर बांधनी करावी, जिर्ण मोडकळीस आलेली जुनी संस्था बंद करावी म्हणून,उत्कर्ष मंडळाने जागो जागी बैठका घेतल्या ! समाज प्रबोधन केले व त्याचीच फळ निष्पती म्हणजे अंमळनेर येथे आॅक्टोबर २०१२ मध्ये अ.भा.ब.समाजाचे अधिवेशन २२ वर्षां नंतर झाले !
  • उपरोक्त चळवळीच्या माध्यमातून उत्कर्ष मंडळाने समाजाचे बांधनीस वाहून घेतले आहे ! हे सर्व समाज जाणून आहे !
  • उत्कर्ष मंडळाच्या कार्याचा वेल हा वाढताच राहिला आहे !
  • आपल्या बडगुजर समाजाला महाराष्ट्रात शासनाच्या कोणत्याही सवलती मिळत नव्हत्या. या सवलती मिळाविण्यासाठी समाज
    मान्यवरांनी १९६० पासून त्यांचे परीने प्रयत्न केलेत !
    पाचोरा येथील माजी प्राचार्य श्री.पुंडलिक रामचंद्र बडगुजर यांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग आयोग पुणे, महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय मंत्रालय मुंबई, उच्च न्यायालय सामाजिक विभाग मुंबई यांचेशी सदोदित पत्रव्यवहार करुन बडगुजर समाजाला OBC सवलत मिळावी यासाठी सहकार्य होते.
  • सन २००६ मध्ये तत्कालीन अध्यक्ष- उत्कर्ष मंडळ,मुंबई ने ओ. बी. सी. सवलतीच्या प्रकरणात लक्ष घातले. त्यासाठी बैठका घेतल्या. त्यातून संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. सतत दोन वर्ष उत्कर्ष मंडळाने सर्व थरावर हा प्रश्न लावून घरला !
    समाजाला ओबीसी सवलत मिळावी विषयाला वाचा फोडण्यासाठी जळगांव, धुळे(खान्देशातून) समाज कार्यकर्त्यांच्या सहकार्याने व प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग पुणे व मंत्रालयीन पाठपुरावा करण्या साठी मुंबईच्या कार्यकर्त्यांनी हिरीरीने भाग घेवून मुख्यतः तत्कालीन मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख उप मुख्यमंत्री, कै.आर.आर.पाटील, मंत्रालय सुरक्षा विभाग माजी.पोलिस सहा.आयुक्त माननीय श्री.रमेश वामनराव बडगुजर यांनी
    सामाजिक न्याय मंत्री मा.श्री.चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांचेशी संपर्क करुन व सहकार्याने प्रयत्न करुन इतर मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी नुसार महाराष्ट्र सरकारने ई.स.२००८ मध्ये बडगुजर समाजाला इतर मागासवर्गीय सवलतीचा अध्यादेश (जी.आर) (OBC) यादीत समावेश करण्यात आला.
  • २००८ जून मध्ये शासनाने आपल्या समाजा महाराष्टात ओ बी सी सवलती मंजूर केल्या !
  • या साठी महाराष्टातील बडगुजर समाजाने, उत्कर्ष मंडळाने आखलेल्या योजनाना पूर्ण साथ दिली !
  • बडगुजराचे एकसंघ नेतृत्व,एक झेंडा एक मागणी चां हा विजय ,! बडगुजराच्या इतिहासात प्रथमच मिळाला हे सर्व मान्य झाले आहे !
  • २००८ पासून समाजाची ख-या अर्थाने शैक्षणिक,आर्थिक, सामाजिक प्रगती सुरू झाली ! असे म्हटल्यास वावगे ठरू नये
  • एवढा समाज इतिहासाचा पसारा मांडण्याचा माझा प्रयास हा आपल्या ध्यानात आला असेलच !
  • आज बडगुजर समाज लोकशाही पध्दतीने मार्ग क्रमण करीत आहे. अ.भा.ब.स.महा समिती व त्या अंर्तगंत समित्या ! या
    आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत.या सर्व समित्यांत आज युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे,तदपश्चात बडगुजर समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टीने वैद्यकीय,
    इंजिनिअरिंग,सिव्हिल, संगणकीय,अशा एक नाही तर अनेक क्षेत्रात मुलां मुलींनी प्राविण्य मिळवून आपला ठसा उमटवून आपले व आपल्या आई वडिलांचा व बडगुजर समाजाचा मान उंचावून नावलौकिकास पात्र ठरवताना दिसत आहेत.आज अखिल भारतीय बडगुजर समाज महा समिती अंतर्गत युवक समिती प्रमुख श्री.दिलीप राघो बडगुजर यांचे नेतृत्वाखाली तसेच एकविसाव्या शतकात इंटरनेटच्या माध्यमातून व्हॅस्ट्अॅप,बडगुजर अॅप,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टलच्या सहाय्याने बडगुजर समाज हा एकमेकांशी जोडला गेला असून तरुण युवकांना सामाजिक बांधिलकीची ओढ लागल्यामुळे समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेताना दिसून येत असताना समाजातील व विविध प्रकारच्या बातम्या,वधू-वर माहिती,
    समाज दर्शिका, व्यावसायिक, नोकरी विषयी,
    समाज मंडळे,समाज बांधवाचा संपर्क नंबर, समाजातील मयत झालेल्या व्यक्तिंना श्रध्दांजली,समाजाचा इतिहास असे अनेक उपक्रम या माध्यमातून लायू अपडेट बडगुजर समाजा पर्यंत पोहचवण्यात अल्पावधीतच यशस्वी झाल्याचे दिसते आहे.
    मात्र मित्रांनो हे समाज कारल्याची शिव धनुष्य पेलतांना,आपसात गट तट,स्पर्धा यांचा लवलेष ही लावून घेवू नका !
  • नाव लौकीक हा तुमच्या कार्या मुळे आपोआप दूर वर पोहचेल ! यांचे भान आपण ठेवा ! व ख-या अर्थाने समाज कारणच करा ! अशी आपल्या तरूणांना नम्र प्रार्थना !
    आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा!
  • हा लेख मी माझ्या माहितीतील कार्याचा आढावा घेऊन लिहिला आहे. कदाचित यात बदल असू शकतात. ते आपण सुचवावे.
    अ.भा.बडगुजर समाज ओबीसी समिती उप प्रमुख श्री.एस्.एम्.बडगुजर यांचे कडून ह्या सर्व टीम वर्क करणारे युवक युवतींचे मन:
    पूर्वक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!
श्री. एस. एम. बडगुजर सर

4 Comments

  1. श्री.एस्.एम्.बडगुजर,उप प्रमुख,अखिल भारतीय बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती यांनी अत्यंत विचारपूर्वक आणि दिलखुलासपणे बडगुजर समाजांतील घडामोडी,ओबीसी संबंधीची समाजाने घेतलेली भुमिका,समाजासमोरील आव्हाने,तरूणाईचा सिंहाचा वाटा तसेंच समाजांत ऐक्य भावना नांदत रहाणेसंबंधीचे केलेले आव्हान इत्यादि विचार मांडलेत यावरून त्यांची समाजाप्रतीची काळजी,समाज संघटन व ऐक्यासंबंधीच्या कार्याची तळमळ-त्यांचे तनमनांत रुजल्याचे दिसून येत असल्याचे जाणवलेशिवाय राहत नाही.सद्यस्थितीत बडगुजर समाजाला केंद्रात ओबीसीचे आरक्षण मिळणेचे दृष्टीने,अ.भा.बडगुजर समाज ओबीसी समिती प्रमुख,उपप्रमुख व समिती सदस्य कार्यरत आहेत,सदर कार्यात लवकरच यश अपेक्षित आहे.सदर कार्यासांठी अ.भा.ब.समाज ओबीसी समितीस कोटीकोटी शुभेच्छाll.
    ll शुभम् भवतूः ll

  2. मनःपूर्वक धन्यवाद..!
    उपयुक्त माहिती.
    थोड्या शब्दात आजपर्यंतचा इतिहास.

  3. बडगुजर समाज प्रगतीचा आढावा व विश्लेषण अभ्यासपुर्वक आहे.
    समाजाचा प्रगतीचा हा आलेख असाच उंचावत राहणार हा विश्वास वाटतो.
    श्री. एस.एम.बडगुजर आपले खूप अभिनंदन

  4. * दोन दशकाची बडगुजर समाज कार्याचा ठोक ताळा माझ्या माहिती प्रमाणे देण्याचा अल्पसा प्रयत्न मी केला आहे !
    ‌* ही माहिती वाचून अनेक समाज बांधवांनी या पामराचे जे कौतुक केले,त्यामुळे मी भारावून गेलो व अधिक समाज कार्य करण्याची प्रेरणा मला यातून मिळाली आहे !
    ‌* आपल्या या मन:पुर्वक आपुलकी बद्दल आभारी आहे !
    ‌* याच प्रमाणे माहितगारांनी,आपल्या परिसरांतील,समाज कार्याची ओळख या माध्यमातून करावी,अशी विनंती !
    ‌* आपला विश्वासु,
    ‌ओबीसी समिती उप प्रमुख-
    ‌श्री.एस्.एम्.बडगुजर

Leave a Reply to श्री.एस्.एम्.बडगुजर, बी/२, देवचंद निवास, घनश्याम गुप्ते रोड, डोंबिवली Cancel reply

Your email address will not be published.


*