21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस – योग सप्ताह वेगवेगळ्या योगासणांची माहिती देऊन साजरा करणार

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जूनला साजरा करण्यात येतो. योग हा असा व्यायामाचा प्रकार आहे ज्याच्या मुळे शरीराचे अंगच नाही तर मन, मस्तिष्क, आत्म्याचे संतुलन केले जाते. सन २०१५ मध्ये जगभरात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिवसांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. योगामुळे जीवनात आनंद निर्माण करता येतो, तसेच त्यातून रोगमुक्ती साधता येते. तसेच चांगली जीवनपद्धती जगता येते आणि अनेक असाध्य रोगांचा इलाज विनाऔषधी करता येतो. योग ही भारतीयांनी एक उत्कृष्ट भेट जगाला दिलेली आहे. केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्व आता जगभरात सिद्ध झाले आहे. योग हा एकमेव असा व्यायामप्रकार आहे, ज्याद्वारे संपूर्ण शरीराची काळजी घेतली जाते – शरीरातील सर्व अवयव, मन आणि आंतरआत्म्याचीही, एका अर्थाने योगा तुम्हाला अधिक तरुण बनवितो आणि तेदेखील आंतरबाह्य स्वरुपात,” 21 जून हा वर्षभरातील सर्वात मोठा दिवस असतो त्याप्रमाणेच योग सुद्धा आपल्याला दीर्घायुष्य प्रदान करतो. म्हणुनच अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप 20 जून ते 27 जून पर्यंत योग सप्ताह साजरा करत आहोत त्यानिमित्ताने आम्ही या सप्ताहात आपल्या badgujar.in वेब पोर्टल वर विविध योगासने व त्यांची करण्याची पद्धत तसेच त्यांचे आरोग्यदायी फायदे या बद्दल विस्तृत माहिती देणार आहोत. तसेच आपणही या सप्ताहात सहभागी होऊन आपल्या प्रतिक्रिया आपले योगाचे फोटो इत्यादी आपल्या badgujar.in वेब पोर्टल वर पाठवू शकता.

____श्री. दिलीप राघो बडगुजर

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती प्रमुख

???????

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती

बडगुजर प्राउड ग्रुप

????????

3 Comments

  1. अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप तसेच वेब पोर्टल टीम कडून नेहमीच नावीन्यपूर्ण कार्यक्रम,उपक्रम, माहीती, विषय हे समाजासाठी राबविण्यात येतात नेहमीच या टीम कडून समाज उपयोगी विषय हाताळण्यात येतात. फक्त समाजाचा विकासच नाही तर सर्वांगीण विकास यातून साधण्याचा प्रयत्न असतो.
    आता सप्ताह साजरा करून समाजाला आरोग्यदायी हेल्थी समाज बनवण्याचा एक उत्तम उपक्रम राबवत आहात.

    संपूर्ण टीमचे धन्यवाद, अभिनंदन व शुभेच्छा ????

    • अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर्स प्राउड समिती तथा “एक समाज एक व्यासपीठ” प्रेरीत वेब पोर्टल टीम सातत्याने वस्तुस्थिती व सद्यस्थितीची सांगड घालण्याचे उद्देशाने नवनवीन कल्पना राबविण्याचे उत्कृष्ठ कार्य सातत्याने करत आलेले आहे व करत आहेत-त्यापैकीच “२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे” औचित्य साधून उद्या “दिनांक २० जून ते २७ जूनपर्यंत योग सप्ताह साजरा करण्याचा महत्वपूर्ण घेतलेला निर्णय म्हणावा लागेल.

      घडवून आणत आहांत योग सप्ताहाचा ‘योग’l
      समाजाच्या बंधूभगिनींच्या स्वास्थ्यासांठीचा ‘उपयोग’ll

      आयोजकांचे मनःपूर्वक कौतुक व शुभेच्छाl
      “शुभम् भवतूः”

  2. अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप तसेच वेब पोर्टल टीम कडून नेहमीच नावीन्यपूर्ण कार्यक्रम,उपक्रम, माहीती, विषय हे समाजासाठी राबविण्यात येतात नेहमीच या टीम कडून समाज उपयोगी विषय हाताळण्यात येतात. फक्त समाजाचा विकासच नाही तर सर्वांगीण विकास यातून साधण्याचा प्रयत्न असतो.
    आता योग सप्ताह साजरा करून समाजाला आरोग्यदायी हेल्थी समाज बनवण्याचा एक उत्तम उपक्रम राबवत आहात.

    संपूर्ण टीमचे धन्यवाद, अभिनंदन व शुभेच्छा ????

Leave a Reply to दिनेश बडगुजर Cancel reply

Your email address will not be published.


*