श्री. सतिश वसंत बडगुजर, नाशिक यांंचा रक्तदान करण्याचा अनोखा संकल्प

श्री. सतिश वसंतराव बडगुजर, हे मूळचे अंमळनेर येथील पण त्यांचं शिक्षण, जन्म सर्व बडोद्यात झाले आहे. ते आता नासिक येथे एसटी महामंडळ वर्क शॉप मध्ये ब्लॅक स्मिथ म्हणून काम करत आहे.

त्यांना रक्तदान करण्याची आवड आहे. त्यांनी पन्नास वेळेस रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत बडोदा येथे 12 ते 15 वेळेस व उरलेले नाशिक येथे असे एकूण तीस वेळेस रक्तदान केले आहे.

श्री. महेश रामकृष्ण बडगुजर यांचा आज सकाळी रक्तादान विषयीचा मेसेज वाचला. आणि आज देखील त्यांनी रक्तदान केले.

त्यांचा 50 वेळेस रक्तादान करण्याचा संकल्प परमेश्वर पूर्ण करो, हेच भगवंताकडे मागणे मागतो. तसेच त्यांच्या या महादानामुळे बऱ्याच लोकांना याचा फायदा झालेला आहे. श्री. सतिश बडगुजर यांना अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपचा सलाम.

3 Comments

Leave a Reply to Pranay Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*