कुर्हे येथील सरपंच श्री. रामलाल बडगुजर यांच्या प्रयत्नांंतून जळगांव – कुऱ्हे पानाचे बस सेवा नियमित

चालक, वाहकांचा गौरव करताना सरपंच रामलाल बडगुजर व ग्रामस्थ

गेल्या तीन वर्षापासून जळगाव ते कुऱ्हे पानाचे बस कंडारी, वराडसिममार्गे कुऱ्हे पानाचे गावात न येता वराडसिम वरूनच परत जात होती.

रस्ता प्रवासी वाहतुकीसाठी अयोग्य असल्याचे कारण सांगत बस कुऱ्हे पानाचे गावात येत नव्हती.

श्री. रामलाल बडगुजर यांनी या संदर्भात ग्रामपंचायतीत ठराव मंजूर करून विभाग नियंत्रक यांना निवेदन दिले होते. याची जळगाव आगाराने दखल घेतली शनिवार (दि. 8) पासून बस सेवा सुरळीत झाली आहे.

सकाळी दहा वाजून 15 मिनिटांनी सरपंच रामलाल बडगुजर, ग्रामपंचायत सदस्य नारायण कोळी, राजाराम शिंदे, भागवत शिंदे व ग्रामस्थांनी बस स्वागत केले, तसेच बस चालक ईश्वर कोळी आणि वाहक संतोष कोळी यांना गौरवण्यात आले.

यामुळे विद्यार्थी आणि चाकरमाण्यांची गैरसोय दूर झाली. श्री. रामलाल बडगुजर हे एक कर्तृत्वदक्ष, प्रामाणिक आणि कुर्हे गावातील बडगुजर समाजाचे बुलंद नेतृत्व आहे.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*