अमळनेर येथील कु. विशाखा धिरज कोठवाल हिने एस्. एस्. सी परीक्षेत 94.60% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम

फागणे येथील सेवानिवृत्त प्राचार्य श्री. रतिलाल जगन्नाथ कोठवाल व भुसावळ येथील रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री. रमेश शिवराम पवार यांची नात अमळनेर येथील शिवाजी विद्यालयाचे उपशिक्षक श्री. धिरज रतिलाल कोठवाल व सौ अनिता धिरज कोठवाल यांची सुकन्या कुमारी विशाखा धिरज कोठवाल हिने एस.एस.सी परीक्षेत 94.60% गुण मिळवून ती डी. आर. कन्या शाळेतून प्रथम आली. विशेष म्हणजे विशाखा हिने गणित विषयात शंभर पैकी शंभर मार्क मिळून यश संपादन केले. बडगुजर समाजातील ती एकमेव अशी विद्यार्थीनी आहे की जिने गणित विषयात पैकी च्या पैकी मार्क मिळविलेत. तसेच तिने तिचे आजोबांचे 1968 सालाचे गणित विषयातले 99/100 गुणांचे रेकॉर्ड तोडले. याचे तिचे आजोबा श्री आर.जे कोठवाल सर यांना खूपच आनंद झाला आहे.

तिच्या या यशात शाळेतील सर्व शिक्षक व बडगुजर क्लासेसच्या संचालिका सौ. शर्मिला बडगुजर व श्री संजय मगनराव बडगुजर यांचा अनमोल वाटा आहे.

कु. विशाखा च्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका, शाळेतील सर्व शिक्षक व तिचे सर्वे नातेवाईक फागणे येथील कोठवाल परिवार आदी सर्वांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिले आहेत. भविष्यात मला इंजिनेरिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे असे तिने इच्छा व्यक्त केली आहे.

कु. विशाखा धिरज कोठवाल

कु. विशाखा ही अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समितीचे, बडगुजर प्रॉउड ग्रुप चे सदस्य व फागणे बडगुजर समाज मंडळाचे सचिव श्री. प्रणव र. कोठवाल व श्री. राकेश र. कोठवाल यांची पुतणी आहे.

विशाखाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. असेच यश ती संपादन करत राहो… आणि नविन किर्तीमान प्रस्थापित करत राहिल… All the very Best Vishakha

अ. भा. ब. स. युवक समिती

कु. विशाखाचा आई वडिलांन सोबत सत्कार करतांना महाजन सर

बडगुजर प्राऊड ग्रुप

1 Comment

  1. मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा…विशाखा ???

Leave a Reply

Your email address will not be published.


*