श्रीजी अभ्यासिकेतर्फे दर्शन बडगुजर चा सत्कार

शिंदखेडा (प्रतिनिधी) – येथील कचेरी चौक
परिसरातील आनंद पान सेंटरचे मालक धनराज भगवान
बडगुजर (डांगे) यांच्या मुलगा दर्शन बडगुजर ने वैद्यकीय
सामायिक परीक्षेत (नीट) ७२० पैकी ५२९ गुण मिळवत
प्राविण्य मिळवले आहे. दर्शन ने महाराष्ट्र सीईटी परीक्षेतही
९९.९६ परसेंटेज घेत त्यातही गुणवत्ता सिद्ध केली
आहे.

धनराज बडगुजर हे सर्वसामान्य पान टपरी चालक
असून आपला चरितार्थ जेमतेम चालवतात यांच्या भाऊ
प्राध्यापक संजय बडगुजर याने दर्शनला मार्गदर्शन केले
शिंदखेडा येथील श्रीजी अभ्यासिकेचे अध्यक्ष सुनील
चौधरी, माजी सभापती प्रा सुरेश देसले यांनी दर्शनचा
व त्यांचे वडील धनराज बडगुजर यांच्या सत्कार केला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा दिपक माळी यांनी केले
यावेळी अभ्यासिकेचे संचालक अशोक गिरणार, योगेश
चौधरी, पत्रकार जितेंद्र मेखे, प्रा संजय बडगुजर तसेच
अभ्यासक उपस्थित होते वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश
घेऊन आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्याचा मनोदय दर्शन
यांनी व्यक्त केले

दर्शन बडगुजर याला त्याच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…

शुभेच्छुक

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती

बडगुजर प्राउड ग्रुप

1 Comment

Leave a Reply to रामकृष्ण बडगुजर, दोंडाईचा (धुळे) Cancel reply

Your email address will not be published.


*