चि. सौ. का. गुणेश्वरी व चि. विकास बडगुजर यांचा शुभविवाह सोहळा कानुश्री मंगल कार्यालय धुळे येथे संपन्न

श्री. सुभाष पुनाशेठ बडगुजर यांचे सुपुत्र चि. विकास व श्री. राजेंद्र रामदास बडगुजर, कुर्हे पानाचे यांची सुकन्या चि. सौ. का. गुणेश्वरी (गायत्री) यांचा शुभ विवाह सोहळा ९ जुन रोजी दुपारी संपन्न झाला. चि. सौ. का. गुणेश्वरी (गायत्री) ही बडगुजर्स प्राऊड ग्रुपचे लोकेश कोतवाल यांची चुलत बहीण.

त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मा. श्री. उमेश आप्पा करोडपती, अध्यक्ष, अ. भा. ब. स. महासमिती, श्री. आनंदाशेठ सुर्यवंशी, मा. अध्यक्ष, अ. भा. ब.स. महासमिती, मा. श्री. राजेंद्र बडगुजर सर, महासचिव, अ. भा. ब. स. महासमिती, श्री. ईश्वर बडगुजर सर, संपादक, बडगुजर समाजदूत, श्री. प्रकाश बबन बडगुजर, संपादक, बडगुजर दर्शन, सौ. रत्नाताई बडगुजर, अध्यक्षा, अ. भा. ब. स. महिला समिती, सौ. स्नेहलताई जाधव, नगरसेविका, धुळे, प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे, श्री. हिरालाल बडगुजर सर, धुळे यांच्या उपस्थितीत व सर्व समाज बांधव नातेवाईक यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला.

नवविवाहित दांम्पत्यास हार्दिक शुभेच्छा.

चि. सौ. का. गुणेश्वरी व चि. विकास बडगुजर

अ. भा. ब. स. महासमिती,

अ. भा. ब. स. युवक समिती,

बडगुजर्स प्राऊड ग्रुप.

1 Comment

  1. चि.सौ.गुणेश्वरी व चि.विकास यांचा विवाह सोहळा दि.९.६.२०१९ रोजी शानदाररित्या संपन्न झाला,सदरप्रसंगी समाजातील मान्यवरांचे नवविवाहितांना आशिर्वाद लाभलेत,मलाही उपस्थित राहण्याचा योग आला.
    नवविवाहितांना नववैवाहिक जीवन सुखसमृध्दीचे व आनंददाई जावो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. शुभम् भवतूः

Leave a Reply to C.D.Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*