चि. हर्षद याला S. S. C च्या निकालात 87.60% गुण संपादन

पारोळा येथील अखिल भारतीय बडगुजर समाज महिला मंडळ अध्यक्षा – सौ सुनंदा नितीन बडगुजर यांचे चि. हर्षद बडगुजर (रघुवंशी) यांनी नुकताच जाहीर झालेल्या 10 वी(SSC) च्या निकालात 87.60% गुण संपादन करून घवघवीत यश मिळविले चि. हर्षद हे पारोळा येथील सौ. एम. यू. करोडपती इंग्लिश मीडियम स्कूल चा विद्यार्थी असून त्यांनी शाळेतून पहिला येण्याचा बहुमान पटकावला आहे. अत्यंत बिकट अश्या परिस्थितीत व कठोर परिश्रम घेऊन त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशात त्यांची आई सौ. सुनंदाताई, वडील श्री. नितीन बडगुजर व शाळेचे शिक्षक यांचा अनमोल वाटा आहेत्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री आप्पासाहेब उमेश करोडपती (अध्यक्ष – अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती) यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच श्री. किशोर बडगुजर (शिंदखेडा) व श्री. दिनेश बडगुजर – जळगाव जिल्हाअध्यक्ष – अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती यांनी देखील अभिनंदन केले.चि. हर्षद आपल्या या यशाबद्दल अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप तर्फे आपले व आपल्या संपुर्ण परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करतो व तसेच आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा….. ?????शुभेच्छुक ??अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती?बडगुजर प्राऊड ग्रुप?अखिल भारतीय बडगुजर समाज मंडळ, पारोळा?अखिल भारतीय बडगुजर समाज महिला मंडळ, पारोळा

1 Comment

Leave a Reply to रामकृष्ण बडगुजर, दोंडाईचा (धुळे) Cancel reply

Your email address will not be published.


*