नको हा उन्हाळा उन्हाळा
वृक्षारोपणाचा संपला जिव्हाळा
चहूकडे माळरान रखरखीत उन्हाची
आकाशात ढग नाही, तहान मात्र पावसाची
सूर्य तापला ग्रीष्मा पातला, ऊन पडे जिकडे-तिकडे,
हा मानवा एसी कुलरात बसून घाले देवाला साकडे,
हाताश होऊन बंद घरे-दारे, पशुपक्षीही शोधती वनचरे.
तप्त घरे तप्त वारे, उष्माघाताने निष्पाप बळी सारे.
बंद वारा वाढतो पारा, अंगातून निघतात घामाच्या धारा.
आजही शोधतो खरा, वाटसरू वृक्ष छायेचा सहारा.
दरवर्षी खड्डा तोच, नव रुक्ष लावण्याचा हेवा
फेसबुक, व्हाट्सअप वर दिसतो चेहरा नवा…
प्रत्येकाचा एकच व्हावा नारा, पावसाचा केव्हा बरसती धारा,
निसर्ग होईल हिरवागार सारा, होईल भारत सुख-समृद्धी मान्य खरा…
आता तरी वृक्षामुळे मिळे ऑक्सिजन, वृक्ष तोडता संपते जीवन…
वृक्षारोपण व संगोपन थांबवू प्रदूषण, स्वच्छ सुंदर भारत करू प्रबोधन…
मग हवा हवा वाटेल उन्हाळा
मानवतेचा खरा ठरेल जिव्हाळा…….
शब्दांकन – बडगुजर हेमंत निंबा,
कलाशिक्षक रा. माध्य. विद्यालय कुर्हे पानाचे


Leave a Reply