“१२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी विषयक पदवीसांठी संधी” – प्रा. सी. डी. साळुंखे सर

बारावीनंतर बरेचसे विद्यार्थी इंजिनीअरिंग,मेडिकल आणि इतर अभ्यासक्रमांकडे वळतात.पण भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणार्‍या कृषी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल कमी जाणवत असला तरी कृषी क्षेत्रात मोठी संधी असल्याचे लक्षांत येऊ लागल्याने विद्यार्थी कृषी क्षेत्राकडे लक्षकेंद्रीत होणे सद्यस्थितीची गरज आहे.

पात्रता: बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र (Physics)जीवशास्त्र,(Biology) रसायनशास्त्र (Chmistry)हे विषय घेऊन कमीतकमी ५०%गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक.(गणित व इंग्रजी विषय १२वीला घेतलेले उत्तमच नसल्यास कृषी महाविद्यालयात पुर्ण करावे लागतात)

पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम:
1) बी.एस्सी (कृषी)
2) बी.एस्सी (उद्यानविद्या)
3) बी.एस्सी (वनशास्त्र)
4) बी.एफ.एस्सी
5) बी.एस्सी (कृषी जैवतंत्रज्ञान)
6) बी.एस्सी (पशुसंवर्धन)
7) बी.टेक (अन्नशास्त्र)
8) बी.बी.ए. (कृषी)
9) बी.टेक (कृषी अभियांत्रिकी) 10) बी.एस्सी (गृहविज्ञान)

प्रवेश प्रक्रिया:कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देतांना बारावीला मिळालेल्या एकूण गुणांची टक्केवारीची ३०% सीईटीला मिळालेल्या गुणांची टक्केवारी ७०% धरण्यात येते.तसेंच बारावीला शेती विषय घेतला असल्यास त्याचे १० गुण व ७/१२चा उतारा असणाऱ्या शेतीधारकांच्या किंवा भूमिहीन शेतमजुरांच्या (तहसीलदार/नायब तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक) पाल्यासाठी १२ टक्के(परंतू एकूण २०टक्के वाढीव गुण प्रवेशासांंठी ग्राह्य धरले जातात.)
[म्हणजे १२वीला ८०% च्या ३०टक्के=(२४ गुण)+ MHT CETची टक्केवारी ७६%x७०=(५३.२०गुण) असे {२४+५३.२०=७७.२०%} ६६टक्के गुण ग्राह्य धरले जातील. त्यानंतर १२ वीला कृषी विषय घेतला असल्यास १० व ७/१२उतारा किंवा भूमीहीन उताराधारकास १२ गुण (पण जास्तीत जास्त २०% वाढीव गुण मिळतात) म्हणजेच वरील ७७.२०+२०=९७.२० % गुण ग्राह्य धरुन मेरीटनुसार प्रवेश मिळेल.]

गेल्या वर्षा पासून कृषी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेसाठी MHT CET परिक्षा आवश्यक करणेत आली आहे.

करिअर संधी:राज्यातील चारही कृषी विद्यापीठे व त्यांचे अंतर्गत शासकीय व खाजगी कृषी महाविद्लये,व कृषी विद्यालये,कृषी विज्ञान केंद्रे, साखर कारखाने, सूतगिरण्या,बी-बियाणे कंपन्या,खते व खतोत्पादक कंपन्या,तसेंच तणनाशक, बुरशीनाशक- कीडनाशक उत्पादक कंपन्यामध्ये नोकरीची संधी,तसेंच राज्यातील महसूल विभाग,वन विभाग,पोलीस खाते,वित्त विभाग इत्यादी विभागांमध्ये वर्ग-१, वर्ग-२ पर्यंतच्या सर्व पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कृषी अधिकारी/ विकास अधिकारी,अन्न महामंडळ,पणन महामंडळ व खादी ग्रामोद्योग या ठिकाणीही कृषी पदवीधारकांना नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे व कृषी महाविद्यालये :

१.महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर, 413722
http://mpkv.mah.nic.in

शासकीय कृषी महाविद्यालयेः1.कृषी महाविद्यालय,पुणे,धुळे,नंदुरबार,कोल्हापूर.

२. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, 444104
http://pdkv.mah.nic.in

कृषी महाविद्यालय अकोला,नागपूर,अमरावती
3.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, 431402
http://mkv2.mah.nic.in

कृषी महाविद्यालय,परभणी.

४. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी, 415712
http://www.dbskkv.org

कृषी महाविद्यालय,दापोली.

या व्यतीरिक्त महाराष्ट्रातील अनेक खाजगी कृषी महाविद्यालयांमध्ये वर दिलेल्या शासकीय कृषी महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळूं शकतो.

महत्वाची टीपःमहाराष्ट्रात कृषी विषयक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया आॕनलाईन MCAER Pune द्वारे होत असते,या वर्षीची प्रक्रिया लवकरच सुरूं होईल.नित्याने वृत्तपत्रे वाचावी.

अधिक माहितीसांठी MCAER Puneची वेबसाइट पहावी

महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय व खाजगी कृषी महाविद्यालये संबंधीची माहिती mcaer या वेबसाइटवर मिळेल.
आॕन लाईन अर्ज भरतांना कृषी महाविद्यालय निवडतांना(आॕप्शन देतांना)विशेष काळजी घ्यावीl

llशुभम् भवतूःll

प्रा.सी.डी.साळुंखे(MScAgri.)
सेवानिवृत्त कृमविधुळे.
संपर्कः9421617283

प्रा. सी. डी. साळुंखे सर

3 Comments

  1. सर आम्हाला शेती नाही तर भुमिहीन चा दाखला मिळेल का? तो तालुक्यातील तहसीलदार यांच्या किव्हा कलेक्टर याचा पैकी कोनाचा चालेल तो सागा सर pls.

    • तहसीलदारकडे मिळू शकेल.
      ७/१२ उताराधारकास किंवा भूमीहीन शेतकरी/शेतमजूरास यावर्षापासून मार्क्स् न देता ६% आरक्षणाचा निर्णय शासनाचे विचाराधीन आहे,कारणे कृषी प्रवेश प्रक्रिया रखडली आहे,(सुरू होणेसांठी उशीर होत आहे)येत्या आठवड्यात नवीन नियम निर्णयानंतर प्रवेश प्रक्रिया सुरूं होणेची शक्यता आहे.

  2. ॲडमिशन प्रक्रिया आजपासून सुरवात होणार,तत् संबःधीचे प्राॕस्पेक्टस् वेब पोर्टलवर टाकले आहे.भुमीहीन असलेचा दाखला तहशीलदारकडे मिळू शकेल.प्राॕस्पेक्टस्मध्ये(८३पाने)सविस्तर माहिती आहेच त्यांतील अपेंडिक्स् (प्रपत्रे) वाचून भरावयाची आहेत.

Leave a Reply to Anand Pralhad Gangurde Cancel reply

Your email address will not be published.


*